Saturday, April 19, 2025
Home कॅलेंडर खरंच की काय! अभिनयामुळे नव्हे, तर नाकामुळे मिळाला होता ‘किंग खान’ला पहिला चित्रपट

खरंच की काय! अभिनयामुळे नव्हे, तर नाकामुळे मिळाला होता ‘किंग खान’ला पहिला चित्रपट

शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये बादशाह खान या नावानेही ओळखले जाते. कारण, त्याने बॉलिवूडला सर्वोत्तम चित्रपट दिले आहेत. आयुष्यातील खडतर टप्प्यातून गेलेला शाहरुख आज त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी दिल्लीत झाला होता. पण दिल्ली ते मुंबई हा प्रवास आपल्याला देशातील सर्वात मोठा स्टार बनवेल, हे शाहरुखलाही माहीत नव्हते. आज तो प्रत्येक हृदयावर राज्य करतो. त्याची प्रत्येक छोटी गोष्ट चर्चेत असते. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीतही शाहरुखचे नाव अग्रस्थानी आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की शाहरुखला स्टार बनवण्यामागे सर्वात मोठे कारण त्याचे नाक होते. होय, त्याच्या नाकामुळेच त्याला पहिला चित्रपट मिळाला होता. याचा खुलासा खुद्द शाहरुखने एका मुलाखतीत केला होता.

‘दिल आशना है’ मधून झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री
ही गोष्ट त्या दिवसांची आहे, जेव्हा शाहरुख खान प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये काम करत होता. यावेळी त्याने चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचा विचार केला. १९९१ मध्ये शाहरुखला हेमा मालिनी यांच्या ‘दिल आशना है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली, मात्र या चित्रपटात तो सहाय्यक अभिनेता म्हणून दिसला होता. (shahrukh khan birthday the nose that used to try to hide by shahrukh khan the first film dil aashna hai got because of that only)

नाकामुळे मिळाला चित्रपट
हेमा मालिनी यांनी शाहरुखला त्याच्या अभिनयापेक्षा, त्याच्या नाकामुळेच हा चित्रपट मिळाल्याचे सांगितले. हेमा मालिनी यांनी त्याला म्हणाल्या की, “तुझे नाक खूप वेगळे आहे आणि याच नाकामुळे तुला ही संधी मिळाली आहे.”

पसंत नव्हते स्वतःचेच नाक
शाहरुखने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याला त्याचे नाक आवडत नव्हते. म्हणून तो त्याचे नाक लपवायचा. पण त्याला माहीत नव्हते की, तो जे नाक लपवतोय, तेच नाक त्याचे नशीब बदलेल.

SRK-25 Years of Life
‘SRK-25 Years of Life’ हे पुस्तक शाहरुखच्या बॉलिवूडमधील २५ वर्षांच्या कारकिर्दीवर लाँच करण्यात आले होते. या पुस्तकात शाहरुखशी संबंधित प्रत्येक छोट्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकात शाहरुखने आपल्या नाकाशी संबंधित गोष्ट पहिल्यांदाच लोकांना सांगितली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! शाहरुख खानचा छोटा मुलगा अबरामला काजोलचा येतो खूप राग, पण का?

-‘या’ कारणावरून झाला होता शाहरुख अन् सलमानमध्ये वाद, कॅटच्या वाढदिवशी हाणामारीपर्यंत पोहचली गोष्ट

-Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू

हे देखील वाचा