Saturday, July 6, 2024

बॉलिवूडचा किंग खान सेल्फी शेअर करत स्वत:ला म्हणाला ‘गुंडा’; रणवीर सिंगने दिली भन्नाट प्रतिक्रिया

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. शाहरुखने रोमान्सचा किंग म्हणून चाहत्यांमध्ये आपली प्रतिमा निर्माण केली आहे. हीच शाहरुखची प्रतिमा इतर कोणताही स्टार आजपर्यंत निर्माण करू शकला नाही. शाहरुखच्या चाहत्यांची यादी अजूनही लाखांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, जो चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे.

खरं तर शाहरुख खानचा सुपरहिट चित्रपट ‘चक दे ​​इंडिया’ रिलीझ होऊन १४ वर्षे झाली आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्याने अलीकडेच सोशल मीडियावर चित्रपटाच्या दिग्दर्शकांसह शिमीत अमीन, मीर रंजन नेगी, यश राज फिल्म्सचे आभार मानले आहे.

साल २००७ मध्ये रिलीझ झालेल्या ‘चक दे ​​इंडिया’ या चित्रपटाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. या चित्रपटात शाहरुख खान भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसून आला होता. शाहरुखने याच दरम्यानचा स्वतःचा एक सेल्फी शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. शाहरुख खानने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, “या चित्रपटाला इतका सुंदर अनुभव बनवल्याबद्दल चक दे ​​इंडियाच्या सर्व तरुणींचे आभार मानण्याचा विचार केला. त्यांच्याशिवाय इतर सर्वजण या चित्रपटात मला ‘गुंडा’ बनवण्यासाठी या प्रेमाच्या श्रमात सामील आहेत.” (Bollywood’s King Khan becomes ‘Gunda’, Ranveer Singh’s reaction)

किंग खानच्या या पोस्टवर चाहते फिदा आले आहेत. शाहरुखने स्वतःला गुंडा म्हटले आहे, तर त्याचे चाहते त्याचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. त्याचबरोबर अभिनेता रणवीर सिंगने ही शाहरुखच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रणवीर सिंगने शाहरुखच्या पोस्टवर ताजची स्माइल असलेला इमोजी कमेंट केला आहे.

शिमित अमीन दिग्दर्शित ‘चक दे ​​इंडिया’ २००७ च्या यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट भारताचे माजी हॉकीपटू मीर रंजन नेगी यांच्याकडून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाला २००७ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त, विद्या मालवडे, सागरिका घाटगे, शिल्पा शुक्ला, चित्रांशी रावत, तान्या अब्रोल, शुभी मेहता, मासोचॉन झिमिक आणि सीमा आझमी या चित्रपटात दिसले होते.

तर दुसरीकडे शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर शाहरुख खान शेवटचा ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ दिसल्या होत्या. परंतु या चित्रपटाला पडद्यावर फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर शाहरुख ‘झिरो’नंतर कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. आता अभिनेता लवकरच ‘पठाण’ चित्रपटात एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी पूर्ण केले वचन; बिग बींचा ‘चेहरे’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार रिलीझ

-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’

-मुली जान्हवी अन् खुशीसाठी खूपच पझेसिव्ह होत्या श्रीदेवी; तर लग्नानंतर ‘या’ कारणामुळे गेल्या त्या चित्रपटसृष्टीपासून लांब

हे देखील वाचा