शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खानने (Suhana Khan) भलेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसेल, पण ती एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. खरं तर, हे आम्ही नाही, तर तिचे लेटेस्ट फोटो सांगत आहेत. शाहरुखची लाडकी सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सुहानाचे व्हायरल फोटो
सुहाना खानच्या फॅन फॉलोविंगचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, इतक्या कमी कालावधीत सुहाना खानचे केवळ इंस्टाग्रामवर २० लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. अशातच तिने काही तासांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुन्हा एकदा अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. सुहानाचे हे फोटो खूप सुंदर आहेत. पण त्यासोबत फोटोंचे कॅप्शन जास्त मजेशीर आहे. फोटो शेअर करताना सुहानाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “थांबा, तुमच्यासाठी पोझ देते.” (shahrukh khan daughter pose very boldly photo gone viral)
सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया
हे फोटो शेअर केल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. चाहत्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सुहाना खानच्या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. सुहानाच्या फोटोवर कमेंट करत, तिच्या बालपणीच्या मैत्रिणी शनाया कपूर, अनन्या पांडे यांनी हार्ट इमोजी बनवले आहेत. त्याचबरोबर संजय कपूरची पत्नी महीप कपूर, भावना पांडे, सीमा खान यांनीही सुहानाच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनन्या पांडेची आई भावना पांडे यांनी सुहानाच्या फोटोवर कमेंट करताना ‘स्टनिंग’ लिहिले आहे. तसेच सुहाना तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये ऍनिमल प्रिंट गाऊनमध्ये दिसत आहे.
न्यूयॉर्कमध्ये घेतेय शिक्षण
सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमधील टिश स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेत आहे. तिने नुकताच न्यूयॉर्कमधील एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये एक इमारत दिसत आहे, जी अंडर कंस्ट्रक्शन आहे आणि त्याखाली एक ट्रक उभा आहे. ज्यावर लिहीले आहे की, ‘काळजी करू नका, जरी तुम्ही न्यूयॉर्क सोडले तरी तुम्ही नेहमीच न्यूयॉर्कर राहाल’. सुहानाने हा फोटो ब्रोकन हार्टसोबत शेअर केला आहे.
सुहानाचे काम
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. तिने इंग्लंडच्या अर्डिंगली कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले असून, सध्या ती न्यूयॉर्क विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. सुहानाने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ नावाच्या अनेक थिएटर शो आणि शॉर्ट फिल्म्समध्येही काम केले आहे.
हेही वाचा :