Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना झाली २१ वर्षांची, पाहा तिचे न पाहिलेले फोटो

बॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना झाली २१ वर्षांची, पाहा तिचे न पाहिलेले फोटो

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहानाबद्दलची विशेष बाब अशी की, तिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही. परंतु असे असले तरीही तिची फॅन फॉलोविंग ही कमालीची आहे. याबाबतीत ती बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांनाही टक्कर देते. शनिवारी (२२ मे) सुहानाने आपला २१ वा वाढदिवस साजरा केला. सुहानाने सोशल मीडियावर आपली चांगलीच ओळख निर्माण केली आहे. ती नेहमीच आपले स्टायलिश आणि बोल्ड फोटो पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधत असते. तिच्या वाढदिवसानिमित्त पाहा तिचे कधीही न पाहिलेले फोटो…

सुहानाने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करतो. शाहरुख खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, सुहानाला लहानपणापासूनच अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवायचे आहे. त्यासाठी ती परदेशात चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेत आहे.

सुहानाला तिची आई गौरी खानने आपल्या मुलीच्या वाढदिवशी आपल्या इंस्टाग्रामवर सुहानाचा एक खास फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या.

गौरीने फोटो शेअर करत लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला आज, उद्या आणि नेहमीच प्रेम मिळेल.” गौरीच्या या पोस्टवर सुहानानेही रिप्लाय देत “माझं तुझ्यावर प्रेम आहे (I Love You),” असे लिहिले.

तसं पाहिलं, तर सुहानाने आपल्या अभिनयाचा जलवा हा ‘द ग्रेट पार्ट ऑफ ब्ल्यू’ या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवला आहे. परंतु आजही तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सुहाना सध्या न्यूयॉर्कमधील फिल्म स्कूलमध्ये अभिनयाचे धडे गिरवत आहे.

सुहाना बोल्ड फोटोंसोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

हे देखील वाचा