बॉलिवूड गाजवणारा अभिनेता शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित ‘पठाण‘ हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र, चाहते या सिनेमासाठी भलतेच उत्सुक आहेत. अशात निर्मात्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. निर्मात्यांनी नुकतीच शाहरुखच्या या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की, ‘पठाण’ सिनेमाचा ट्रेलर कधी रिलीज होणार आहे. चला तर जाणून घेऊया…
शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी (दि. 10 जानेवारी) सकाळी 11 वाजता रिलीज केला जाणार आहे. अशात चाहते ‘पठाण’ सिनेमाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. चला तर जाणून घेऊया या सिनेमात खास असे काय पाहायला मिळणार आहे.
⚠ Don’t mess with him! The super villain of Pathaan is here ???? #PathaanTrailer out tomorrow at 11 AM!
Hindi: https://t.co/2KaIMh1PSE
Telugu: https://t.co/bmn3jWsrVO
Tamil: https://t.co/tADYAq3vme pic.twitter.com/anlE5ySyCK— Yash Raj Films (@yrf) January 9, 2023
ऍक्शनने भरलेला ‘पठाण’ सिनेमा
सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या ‘वॉर’ (War) सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठाण’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अशात या सिनेमात ‘वॉर’प्रमाणेच ऍक्शन पाहायला मिळेल. याची झलक ‘पठाण’ सिनेमाच्या टीझरमध्ये आधीच पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे, शाहरुखच्या वाढदिवशी 2 नोव्हेंबर रोजी निर्मात्यांनी ‘पठाण’ सिनेमाचा टीझर रिलीज केला होता.
View this post on Instagram
यामध्ये दाखवण्यात आले आहे की, शाहरुख आणि सुपरस्टार जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यात जबरदस्त ऍक्शन सीन्स असतील. तसेच, अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हीदेखील या सिनेमात ऍक्शन अवतारात दिसणार आहे.
The mission is about to start… Aa raha hai #PathaanTrailer launching tomorrow at 11 AM!
Hindi – https://t.co/sNPeRLR5p5
Telugu – https://t.co/istxh0xDhL
Tamil – https://t.co/rb9KKDB0Iw pic.twitter.com/P52XxVZT51— Shah Rukh Khan (@iamsrk) January 9, 2023
तब्बल 5 वर्षांनंतर शाहरुखचे पुनरागमन
सन 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झिरो’ या सिनेमात शाहरुख शेवटचा दिसला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी केली नव्हती. हा सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर शाहरुख 5 वर्षे मुख्य भूमिकेत दिसला नव्हता. मात्र, आता 5 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर तो ‘पठाण’ या सिनेमातून दमदार पुनरागमन करत आहे. शाहरुखचा ‘पठाण’ येत्या 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. अशात शाहरुख या सिनेमातून कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (shahrukh khan deepika padukone starrer pathaan movie trailer releasing this day)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जाळ अन् धूर संगटच! प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवला बोल्ड अंदाज, नेटकरीही म्हणाले, ‘तुमचे *** पाहून मन…’
काय सांगता! पूर्ण कपडे न घालण्यामागे उर्फी जावेदने सांगितले धक्कादायक कारण, तुम्हीही व्हाल हैराण