Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड कदाचित ‘या’ कारणांमुळे शाहरुखने मोडली त्याच्या वाढदिवसाची २० वर्षांची मोठी परंपरा

कदाचित ‘या’ कारणांमुळे शाहरुखने मोडली त्याच्या वाढदिवसाची २० वर्षांची मोठी परंपरा

नुकताच शाहरुख खानचा २ नोव्हेंबर रोजी वाढदिवस झाला. दरवर्षी प्रमाणे शाहरुखचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. शाहरुखचा वाढदिवस म्हणजे फॅन्ससाठी एक पर्वणीच असते. आपल्या आवडत्या कलाकाराचा वाढदिवस फॅन्स वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. मात्र शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे असंख्य फॅन्स त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ या घराबाहेर जमतात आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याची वाट बघतात.

मन्नत बाहेर जमलेले फॅन्स दरवर्षी न चुकता तिथे येतात आणि शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी तासंतास वाट बघतात. हे फॅन्स तिथेच केक कापतात, त्याच्या घराबाहेर वेगवेगळे गिफ्ट्स ठेवतात. शाहरुख देखील त्यांना निराश न करता घराच्या बाल्कनीमध्ये येत सर्वांना अभिवादन करत धन्यवाद म्हणतो आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो. मागील २० वर्षांपासून शाहरुखचा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीचा हा ठरलेला दिनक्रम आहे. मात्र ह्यावर्षी शाहरुखने त्याची ही दोन दशकांची परंपरा मोडली आहे.

शाहरुखचे असे करण्यामागे आर्यन खान आणि त्याचे अं’मली पदार्थ सेवन प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. ३ ऑक्टोबर रोजी आर्यनला एनसीबीकडून तब्यत घेण्यात आले होते. त्यानंतर २८ ऑक्टबरला तब्बल २६ दिवसांनी त्याला जामीन मंजूर झाला. मात्र या २६ दिवसांच्या मोठ्या काळात शाहरुख मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये आलाच नाही. तो सतत स्वतःला मीडियापासून आणि लोकांपासून लांब ठेवत आहे. कदाचित यासाठीच त्याने त्याची वाढदिवसाच्या दिवशी बाल्कनीमध्ये येऊन फॅन्सला अभिवादन करण्याची परंपरा बोलायचे म्हटले जात आहे.

याशिवाय असेही सांगितले जात आहे की, शाहरुख आणि त्याचे संपूर्ण कुटुंब सध्या अलिबागच्या त्याच्या बंगल्यावर असून, त्याने यावर्षी त्याचा वाढदिवस देखील साजरा केला नाही. यासोबतच शाहरुखची मॅनेजर असणाऱ्या पूजा दादलानीने पोलिसांना सांगितले की, मन्नत समोर असलेल्या चाहत्यांना यंदा शाहरुख त्यांना भेटू शकणार नसल्याने त्यांना तिथे थांबायला लावू नका.

दरम्यान शाहरुखला त्याच्या चाहत्याने संपूर्ण जगातून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. यात कलाकारांचा देखील समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटापासून दूर असूनही तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालकीण आहे बच्चन घराण्याची सून, जाणून घ्या ऐश्वर्या रायचे नेटवर्थ

-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?

-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी

हे देखील वाचा