Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड तगडी फॅन फॉलोविंग असणारा ‘किंग खान’ इंस्टाग्रामवर केवळ ‘या’ ६ व्यक्तींना करतो फॉलो! पाहा कोण आहेत ते नशीबवान

तगडी फॅन फॉलोविंग असणारा ‘किंग खान’ इंस्टाग्रामवर केवळ ‘या’ ६ व्यक्तींना करतो फॉलो! पाहा कोण आहेत ते नशीबवान

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला ‘रोमान्सचा बादशाह’ म्हटले जाते. ‘किंग खान’ लाखो- करोडो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करतो. अभिनेत्याचे परदेशातही अनेक चाहते आहेत. शाहरुख खानच्या चित्रपटांची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. तो सोशल मीडियाचा देखील बादशाह आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ट्विटरवर त्याचे ४१.२ दशलक्ष फॉलोवर्स, फेसबुकवर ४२ दशलक्ष, तर इंस्टाग्रामवर २४.८ दशलक्ष फॉलोवर्स आहेत.

शाहरुख खान सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींपैकी एक आहे. तसेच, शाहरुख कोणत्या लोकांना फॉलो करतो, याबद्दल आपण कधी विचार केला आहे का?

या लोकांना किंग खान करतो फॉलो
किंग खान ट्विटरवर जवळपास ७७ जणांना फॉलो करतो, तर इंस्टाग्रामवर तो फक्त ६ जणांना फॉलो करतो. तसेच, सलमान खान इंस्टाग्रामवर २५ जणांचा फॉलो करतो. शाहरुख ज्या ६ जणांना फॉलो करतो, ते सर्व त्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत. या यादीमध्ये पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान, मुलगी सुहाना खान, भाची आलिया छिबा, काजल आनंद आणि पूजा दादलानी यांचा समावेश आहे.

शाहरुख खान दररोज पोस्ट शेअर करणारा कलाकार नाही. मात्र, तो जेव्हा पोस्ट शेअर करतो, तेव्हा ती पोस्ट सोशल मीडियावर धमाल करते. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर आतापर्यंत एकूण ६०५ पोस्ट्स शेअर केल्या आहेत. अलीकडेच अभिनेता ईदच्या दिवशी एक पोस्ट शेअर करत म्हणाला होता की, “जगभरात सर्वांना ईद मुबारक. अल्लाह आपल्या प्रत्येकाला चांगले आरोग्य देवो आणि आपल्या सर्वांसाठी शक्ती प्रदान करो, ज्यांची आपल्या देशात सर्वांना गरज आहे. नेहमीप्रमाणे आपण सर्व जिंकू! लव्ह यू.”

शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. अभिनेता अखेर २०१८ साली ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट पडद्यावर फ्लॉप झाला, पण अभिनेत्याचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला. शाहरुख आता ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी किंग खानने आपला लूकही बदलला आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाबद्दल दररोज नवनवीन अपडेट्स येतात. सध्या कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबले असल्याचे वृत्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करोडपती सुपरस्टार शाहिद कपूरच्या सावत्र वडिलांवर आली वाईट वेळ, खुद्द आईनेच केलाय खुलासा

-अमिताभ बच्चन यांनी जेव्हा पहिल्यांदा केला होता आमिर खानला फोन; उत्तर देताना म्हणायचा फक्त ‘हे’ दोन शब्द

-जेव्हा क्रिकेटवर विनोद करणे अनुष्का शर्माला पडले होते महागात; करण जोहरने ‘या’ शब्दात उडवली होती तिची टिंगल

हे देखील वाचा