Wednesday, July 3, 2024

शाहरुख खानला पाहताच एका फकीराने केली होती ‘ही’ भविष्यवाणी

आपल्याकडे नेहमी एक गोष्ट सांगितली जाते आणि ती गोष्ट म्हणजे भविष्य सांगणाऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आणि का नाही आज मेहनत केली तरच उद्याचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. त्यामुळे अनेकांचा भविष्य सांगणाऱ्यांवर विश्वास नसतो. मात्र क्वचितच बोला फुलाला गाठ पडते आणि वस्तू तथास्तु म्हणून जाते. असेच काहीसे घडले आपल्या किंग खान शाहरुख खानसोबत. बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख आज सर्वांनाच माहित आहे, मात्र जेव्हा शाहरुख एक सामान्य व्यक्ती होता तेव्हाच त्याला त्याच्या भविष्याबद्दल सांगण्यात आले होते.

खुद्द शाहरुख खाननेच या घटनेबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. हा किस्सा सांगताना तो म्हणाला, “खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी माझ्या आईसाठी प्रार्थना करायला अजमेर शरीफ दरगाहला गेलो होतो. तेव्हा माझा बटवा चोरीला गेला आणि त्यात पाच हजार रुपये होते. मी खूपच टेन्शनमध्ये होतो, त्याकाळी पाच हजार रुपयांना खूप किंमत होती. मी खूप प्रयत्न करत होतो तो बटवा मिळवण्यासाठी मात्र तो मिळत नव्हता. अखेर मी हताश होऊन चालत असताना, माझ्यासमोर अचानक एक बाबा आले आणि मला म्हणाले, तू आज हजार रुपयांसाठी टेंशनमध्ये आहेस, मात्र तू टेन्शन घेऊ नकोस लवकरच तुझ्याकडे कोट्यवधी रुपये येणार आहेत. ते बाबा आणि ती घटना मी आजही विसरलो नाहीये.”

पुढे शाहरुख म्हणाला, “मी अजमेर शरीफला माझ्या आईसाठी प्रार्थना करायला गेलो होतो. आज माझी आई तर नाहीये मात्र अजमेर शरीफची दुवा कायम माझ्यासोबत आहे. मी त्या बाबांना शोधायचा खूप प्रयत्न केला, तर ते सापडले नाही. कदाचित त्या बाबांची आणि माझी तेवढी एकच भेट नशिबाने लिहिली असेल.”

आज (२ नोव्हेंबर) ला शाहरुख खान त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखचा यावर्षीचा वाढदिवस होईल की नाही याबद्दल सर्वांनाच खूप शंका होती. कारण शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती आणि तो तुरुंगात होता. मात्र २६ दिवसांनी २८ ऑक्टोबर रोजी आर्यनला जामीन मिळाला आणि शाहरुखच्या वाढदिवसाच्या आधी तो बाहेर आला. शाहरुख त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! शाहरुख खानचा छोटा मुलगा अबरामला काजोलचा येतो खूप राग, पण का?

-‘या’ कारणावरून झाला होता शाहरुख अन् सलमानमध्ये वाद, कॅटच्या वाढदिवशी हाणामारीपर्यंत पोहचली गोष्ट

-Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू

हे देखील वाचा