Friday, October 31, 2025
Home बॉलीवूड जेव्हा वानखेडे स्टेडियममध्ये सुहानासोबत झाली धक्काबुक्की; आक्रमक झाला होता वडील शाहरुख खान

जेव्हा वानखेडे स्टेडियममध्ये सुहानासोबत झाली धक्काबुक्की; आक्रमक झाला होता वडील शाहरुख खान

आख्या देशभरात बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खानचे फॅन आहेत. इथेच नाही, तर विदेशात सुद्धा शाहरुख खानच्या चित्रपटांना खूप लोकप्रियता मिळते. शाहरुखचा रोमान्स करण्याचा अंदाज चाहत्यांचे हृदय जिंकून घेतो. जेवढा चांगला अभिनेता आहे तेवढाच चांगला पिता सुद्धा आहे. त्याच्या तिन्ही मुलांच्या बाबतीत तो खूप प्रोटेक्टीव आहे. शाहरुख स्वतःपेक्षा जास्त मुलांची काळजी करतो. मुलगी सुहाना खानच्या बाबतीत शाहरुख खूप प्रोटेक्टीव आहे, असे नेहमीच ऐकण्यात आणि वाचण्यात येते. शाहरूख सुहानासोबत नेहमी स्पॉट होतो. इतकेच नाही, तर एअरपोर्टवर सुद्धा मीडिया पासून सुहानाचा बचाव करण्यासाठी शाहरुख सजग असतो.

वानखेडे स्टेडियममध्ये सुहानासोबत झाली होती धक्काबुक्की
साल २०१२ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेला क्रिकेट सामना सगळ्यांनाच माहिती आहे. केकेआर आणि सीएसकेचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी शाहरुख खान, पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना वानखेडे स्टेडियमवर आले होते. त्यावेळी मॅच संपल्यावर सुहानासोबत तेथील लोकांनी धक्काबुक्की करत, तिच्यावर कमेंट्स पास केल्या. शाहरुखला जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा तो खूप भडकला आणि सिक्युरिटी गार्डसोबत भांडण केले. त्यावेळचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

पाच वर्षांसाठी शाहरूखला वानखेडे स्टेडियमवर नो एंट्री
या घटनेमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. त्यानंतर शाहरुखने माफी मागत सांगितले, की मी माझ्या मुलीची रक्षा करत होतो. माझ्या जागी दुसरा पिता असता तरी त्याने हेच केले असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा