Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड शाहरुख खानने लाँच केले रितेश अन् जिनिलियाचे ‘प्लांट बेस्ड मीट व्हेंचर’, मजेशीर ट्वीट चर्चेत

शाहरुख खानने लाँच केले रितेश अन् जिनिलियाचे ‘प्लांट बेस्ड मीट व्हेंचर’, मजेशीर ट्वीट चर्चेत

बॉलिवूड सुपरस्टार आणि रोमान्सचा बादशहा अशी ज्याची ओळख आहे, तो म्हणजे सर्वांचा लाडका अभिनेता शाहरुख खान होय. अभिनयासोबत त्याच्या दिलदार स्वभावामुळे देखील तो खूप लोकप्रिय आहे. दिलदारपणे अनेकवेळा तो त्याच्या मित्रांना मदत करत असतो. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग देखील त्याच्यावर फिदा आहे. नुकतेच शाहरुखने त्याचे मित्र रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘प्लांट बेस्ड मीट व्हेंचर’चे प्रमोशन करताना एक मजेशीर ट्वीट केले आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांनी नुकतेच त्यांचे ‘प्लांट बेस्ड मीट व्हेंचर’ लाँच केले आहे. ज्याचे नाव ‘इमेजिन मीट’ असे ठेवले आहे. शाहरुख खानने याला प्रमोट करताना ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या ट्वीटमधील फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने काळ्या रंगाचे जॅकेट आणि पँट परिधान केली आहे. तसेच त्याने डोळ्यांवर गॉगल घातला आहे. या फोटोमध्ये तो आयकॉनिक पोझ देताना दिसत आहे. त्याच्या दोन्ही हातात ‘इमेजिन मीट’चे पॅकेट दिसत आहेत. (shahrukh khan launches riteish and genelia deshmukh’s plant based meat brand tweet)

हा फोटो शेअर करून शाहरुख खानने कॅप्शन दिले आहे की, “माझे मित्र रितेश आणि जिनिलिया देशमुख हा विचार करत होते की, त्यांच्या प्लांट बेस्ड मीट व्हेंचरला कोण लॉन्च करेल? म्हणून मी माझे हात खुले केले आहे आणि म्हणालो की, मी आहे ना. माझ्याकडून इमेजिन मीटच्या टीमला खूप खूप शुभेच्छा.”

शाहरुख खानने केलेल्या या ट्वीटवर रितेश देशमुखने कमेंट केली आहे, “याने माझे हृदय गर्व आणि आनंदाने भरून टाकले आहे. इथंपर्यंत पोहोचायला आम्हाला ३ वर्ष लागले आहे. उफ्फ काय स्वप्न आहे, शाहरुख भाई आय लव्ह यू, असं म्हणतात की, अगर किसी चीज को दिल चाहो तो सारी कायनात उसे पूरा करने की कोशिश में लग जाती है.”

शाहरुख खानने अशाप्रकारे दिलेल्या शुभेच्छा रितेश देशमुखला खूप आवडल्या आहेत. यासोबत अनेक कलाकार तसेच चाहते या पोस्टवर कमेंट करत आहेत, तसेच रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांना शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

-बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून

-दान देताना फोटो काढणाऱ्या कलाकारांवर भडकला रोहित शेट्टी; म्हणाला, ‘फोन करून बोलवल्याशिवाय…’

हे देखील वाचा