Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड चाहत्यांना पचला नाही ‘पठाण’मधील शाहरुख खानचा लूक, पोस्टर पाहून दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

चाहत्यांना पचला नाही ‘पठाण’मधील शाहरुख खानचा लूक, पोस्टर पाहून दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) फिल्मी दुनियेत ३० वर्षे पूर्ण केली आहेत. या खास प्रसंगी, अभिनेत्याने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन प्रथमच चाहत्यांशी संवाद साधला. यासोबतच अभिनेत्याने त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाचे मोशन पोस्टरही रिलीज केले, ज्यामध्ये शाहरुख खान हातात बंदूक घेऊन उभा आहे. शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटात जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार असल्याचे या मोशन पोस्टरवरून स्पष्ट झाले आहे. या पोस्टरवर चाहतेही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

खरं तर, ‘पठाण’चे मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर एका हिंदी न्यूज वेबसाईटने (Amarujala) एक पोल आयोजित केला होता, ज्यामध्ये लोकांना मोशन पोस्टरबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्न होता की, ‘पठाण चित्रपटाच्या मोशन पोस्टरमधील शाहरुख खानचा लूक तुम्हाला कसा वाटला?’ याला उत्तर देताना चांगला, निराशाजनक आणि ठीक, असे तीन पर्याय देण्यात आले होते. ज्यावर चाहत्यांनी अतिशय आश्चर्यकारक उत्तर दिले आहे. (shahrukh khan look fans give negative reaction on film motion poster)

या सर्वेक्षणानुसार, चित्रपटाचे पोस्टर केवळ ३९% टक्के लोकांनाच आवडले आहे. त्याच वेळी, निराशाजनक लोकांची टक्केवारी ४६% आहे. याशिवाय, १५% टक्के लोकांना मोशन पोस्टर ठीक असल्याचे आढळले. ‘पठाण’मधला शाहरुख खानचा लूक चाहत्यांना आवडला नसल्याचे या पोलमधून स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे शाहरुख खान चार वर्षांपूर्वी ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यानंतर अभिनेत्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही आणि आता किंग खान एकाच वेळी तीन चित्रपट घेऊन येत आहे. ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख खान ‘डंकी’ आणि ‘जवान’ चित्रपटात दिसणार आहे. शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही पठाणमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय शाहरुख यावर्षी रिलीज होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे.

हे देखील वाचा