Friday, July 5, 2024

‘किंग खान’च्या घरात राहायचंय? तर एका रात्रीसाठी मोजावे लागतील तब्बल ‘इतके’ लाख रुपये; पाहा आलिशान घराचे फोटो

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत सामील आहे. देशातच नव्हे, तर परदेशातही त्याची संपत्ती आहे. मुंबईतील त्याचे आलिशान घर ‘मन्नत’ पाहण्यासाठी प्रत्येक पर्यटक आवर्जून भेट देतो. पण जर आम्ही तुम्हाला म्हणालो की, तुम्ही शाहरुख खानच्या घरात राहू शकता. मात्र, तुम्हाला केवळ एका रात्रीसाठी तब्बल दोन लाखांहून अधिक पैसे मोजावे लागतील. तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल?

दरवर्षी घालवतो सुट्टी
शाहरुख खानचे हे आलिशान घर लॉस एंजेलिसमध्ये स्थित आहे. यावेळी कोरोना विषाणूमुळे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायला किंग खान इथे येऊ शकला नाही. शाहरुख व्यतिरिक्त प्रियांका-निक, प्रीति झिंटा-जेन गुडइनफ आणि आणि सनी लिओनीचे सुद्धा इथे घर आहे.

मुलांसाठी बनवल्या आहेत वेगळ्या खोल्या
शाहरुखच्या या बंगल्यात सहा मोठ- मोठे बेडरूम आहेत. इथे अभिनेत्याने त्याची मुले सुहाना, अबराम आणि आर्यन खान यांच्यासाठी वेगवेगळ्या खोल्या बनवून घेतल्या आहेत. शाहरुख खानचा हा बंगला लक्झरी रिसॉर्टपेक्षा काही कमी नाही. इथे सर्वत्र हिरवळ आहे आणि मध्यभागी एका महलासारखा हा बंगला आहे. याशिवाय या घरात एक खूप मोठे स्वीमिंग पूलदेखील आहे.

इतके आहे एका रात्रीचे भाडे
शाहरुखचा हा सुंदर बंगला रोडिओ ड्राइव्ह, वेस्ट हॉलिवूड आणि सांता मोनिकापासून अवघ्या ५ मिनिटांवर आहे. विशेष म्हणजे, किंग खानचा हा बंगला राहण्यासाठी भाड्यानेही मिळतो, ज्याचे एक-रात्रीचे भाडे २,३५,५२१ रुपये आहे.

घराचे काही नियमही आहेत
तुम्हाला जर शाहरुखच्या या घरात राहायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालनही करावे लागेल. या घरात धूम्रपान करण्यास बंदी आहे. तुम्ही इथे कोणताही पाळीव प्राणी घेऊन जाऊ शकत नाही. इतकेच नाही, तर या घरात पार्टी करण्यासही मनाई आहे.

इंटेरिअर आहे उत्कृष्ट
या बंगल्याचा लिव्हिंग एरिया देखील खूप मस्त आहे. याच्या सोफ्यावर आणि भिंतींवर शानदार पडदे लावलेले आहेत.

घराच्या सजावटीसाठी मौल्यवान वस्तूंचा वापर केला गेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मास्क न घालता रस्त्यावर ईद साजरी करत होती मुलगी, राखी सावंतने शिकवला चांगलाच धडा; पाहा व्हायरल व्हिडिओ

-अरे व्वा! अगस्त्यने टाकले पहिले पाऊल, हार्दिक आणि नताशाने केला व्हिडिओ शेअर

-‘ओव्हर ऍक्टिंगचे ५० रूपये कट करा’, लस टोचवताना मराठी अभिनेत्रीची नौटंकी पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

हे देखील वाचा