Saturday, June 29, 2024

स्वत:च्या जीवावर सुपरस्टार बनलेल्या शाहरुख खानची संपत्ती आहे तरी किती? आकडा वाचाच

चित्रपटसृष्टीत डोकावले, तर असंख्य कलाकार आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. आणि याच कलाकारांमध्ये समावेश होतो, बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खान याचा. शाहरुख खानला सर्व लाडाने एसआरके या नावाने ओळखतात. त्याच्या अफलातून अभिनयाने त्यानं सर्वांचं मन जिंकलं. तसंच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत त्याचे चाहते आहेत. शाहरुख हा बॉलिवूडमधील टॉप सेलिब्रेटींपैकी एक. शाहरुखने खूप कष्ट करून त्याचं नाव हे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कमावलं आहे आणि लाखोंच्या मनावर राज देखील करत आहे. किंग खाननं त्याच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यापासून केली आहे. शाहरुख खानकडे किती संपत्ती आहे आणि तो किती आणि कसं खर्च करतो हे त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. या लेखातून आपण त्याच्या संपत्तीविषयी जाणून घेणार आहोत.

त्याच्या संपत्तीकडे वळण्यापूर्वी आपण किंग खानचा प्रवास थोडक्यात पाहूया. 2 नोव्हेंबर, 1965 रोजी दिल्लीत जन्मलेल्या शाहरुखने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. शाहरुखचे सुरुवातीचे आयुष्य हे वाईट परिस्थितीतून गेलंय. त्यानं आयुष्यात अनेकदा खस्ता खाल्लाय. इतकेच नव्हे, तर तो अभिनेता बनण्याच्या इच्छेसाठी रेल्वे स्टेशनवरही झोपण्यास तयार होता. त्याची पहिली कमाई होती फक्त 50 रुपये. हे त्याला फौजी नावाच्या टीव्ही मालिकेत काम करून मिळाली होती. मात्र, सगळेच दिवस सारखे नसतात मंडळी. 1992 साली भावाने ‘दीवाना’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला मिळाले होते तब्बल4 लाख रुपये. यानंतर त्यानं अजिबातच मागं वळून पाहिलं नाही, तर अशाप्रकारे किंग खानने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. किंग खानची संपत्ती.

शाहरुख खानच्या आयुष्यात एकापेक्षा एक समस्या होत्या, त्या सर्व त्यानं सहन केल्या आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. खस्ता खात पुढे आलेला हा बॉलिवूडचा किंग खान जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं बॉलिवूडमध्ये १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय.

तुम्हाला ऐकून शॉक बसेल, पण किंग खान हा एकूण 5067 कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याचे मासिक उत्पन्न 20कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

शाहरुख प्रत्येक मूव्हीसाठी जवळपास50 ते 55 कोटी रुपये मानधन घेतो. या व्यतिरिक्त त्याचा सिनेमा जर हिट झाला, तर त्यामध्येही त्याचे वेगळे शेअर्स देखील असतात. मागील काही वर्षांपासून त्याचे चित्रपट सुपरहिट होत नाहीत. मात्र, त्याचा जास्त काही परिणाम त्याच्या कमाईवर होत नाही. किंग खानचं अराबपती होण्याचा कारण फक्त अदाकारीच नाही, तर त्याचे बरेच बिझनेसदेखील आहेत. जसे की, रिअल इस्टेट, प्रॉडक्शन हाऊस, वगैरे वगैरे. या व्यतिरिक्त तो रेड चिली प्रॉडक्शन हाऊसचा मालकसुद्धा आहे. जिथून त्याला वर्षाकाठी कोट्यवधीं रुपयांचा फायदा होतो.

आता शेकडो चित्रपटांमध्ये काम आणि त्यातून पैसा कमावलाय म्हणल्यावर किंग खान तर साध्या सुध्या घरात राहत नसणार, हे मात्र नक्की, तर शाहरुख ज्या घरात राहतो, त्या मन्नतची किंमत आहे 250 कोटींपेक्षाही जास्त. याव्यतिरिक्त त्याचं अलिबागमध्ये एक फार्म हाऊसही आहे. त्याची किंमत 200 कोटींपेक्षाही जास्त आहे. त्याचबरोबर लंडनमध्ये शाहरुखचा २०० कोटींचा बंगला आहे. जेथे सर्व मोठ- मोठे व्यक्ती भाड्याने राहतात. इतकेच नाही, तर अरब देशात शाहरुखचा व्यवसाय चांगलाच पसरलाय. तिथेही त्याचे ‘सिग्नेचर व्हिला’ नावाचे एक घर आहे.

शाहरुख त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखला जातो. त्याला प्रवास करायचा असेल, तर तो काय साध्या सुध्या गाड्या वापरतच नाही. त्याच्या ताफ्यात सामील आहेत जगातील एकापेक्षा एक अशा महागड्या गाड्या. त्यात समावेश होतो तो म्हणजे १२ कोटींच्या बुगाटी वेरॉन, 7 ते 10 कोटींची रोल्स रॉयस फँटम, 4 कोटींची बेंटले कॉन्टिनेन्टल जीटी,2 पेक्षा अधिक कोटींची बीएमडब्ल्यू आय 8,2 कोटींची रेंज रोव्हर व्होग या कार्सचा.

सुरुवातीला 50 रुपये पगारावर काम करणारा शाहरुख, आज वर्षाकाठी 300 पेक्षा अधिक कोटी रुपये कमावतोय. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अनिल कपूर अन् त्यांच्या पत्नीने नातू वायूला दिले ‘हे’ खास गिफ्ट, जाणून घ्या गिफ्टचा अर्थ
अजूनही एडल्ट चित्रपटांचा व्यवसाय करताे राज कुंद्रा? सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना दिले प्रत्युत्तर

हे देखील वाचा