Monday, July 1, 2024

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार ‘हे’ अभिनेते, आगामी चित्रपटांची भलीमोठी यादी एकदा पहाच

देशातील सर्वात मोठी सिनेसृष्टी म्हणून बॉलिवूडकडे पाहिले जाते. वर्षभर अनेक धमाकेदार चित्रपटांची निर्मिती या इंडस्ट्रीमध्ये केली जाते. बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत जे त्यांच्या अफाट लोकप्रियतेसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागलेली असते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले नव्हते त्यामुळे येत्या काळात अनेक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पाहूया कोणत्या अभिनेत्याचे किती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची संपूर्ण यादी. 

शाहरुख खान बॉलिवूडचा  किंग खान बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. झिरो नंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. येत्या काळात शाहरुख खान पठाण आणि अटलीच्या जवान या चित्रपटात दिसणार आहे. हे सर्व बिग बजेट सिनेमे आहेत. त्याचबरोबर डॉन 3 बद्दलही अनेक महत्वाच्या बातम्या समोर येत आहेत. किंग खानच्या  या सर्व चित्रपटांकडून चाहत्यांना मोठ्या आशा आहेत.

रणबीर कपूर अभिनेता  रणबीर कपूरचा शेवटचा संजू चित्रपट प्रचंड गाजला होता.  त्यानंतर आता त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. आलिया भट्टसोबतचा त्याचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वी शमशेराचा ट्रेलरही इंटरनेटवर येताच धुमाकूळ घातला होता. त्याचबरोबर रणबीर कपूरचा एनिमल चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे.

कार्तिक आर्यन अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट सध्या सुपरहिट ठरत आहे. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यानंतर त्याचा शदजादा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येणाऱ्या काळात कार्तिक आर्यन कॅप्टन इंडिया, फ्रेडी आणि समीर विधवानच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

अक्षय कुमार – पृथ्वीराजच चित्रपटातून अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नसला तरी त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. अक्षयचा रक्षाबंधन हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय त्याच्याकडे राम सेतू, बडे मियाँ छोटे मियाँ, सेल्फी आणि गोरखा असे आगामी चित्रपट आहेत. नुकतीच अक्षय कुमारच्या हेराफेरी ३ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आलिया भट्ट –  आलियाकडे सध्या चार चित्रपट आहेत. सर्वप्रथम ती पती रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. याशिवाय रणवीर सिंगसोबत रॉकी और राणीची लव्हस्टोरीमध्येही मुख्य भूमिकेत आहे. प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफसोबत ती ‘जी ले जरा’मध्येही दिसणार आहे. तसेच आलिया डार्लिंग्स या चित्रपटातून निर्माती होणार आहे, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा