Saturday, June 21, 2025
Home बॉलीवूड गौरी खानच्या पुस्तक प्रकाशनवेळी शाहरुख खानने केली चूक, भर कार्यक्रमात सांगितले बायकोचे चुकीचे वय

गौरी खानच्या पुस्तक प्रकाशनवेळी शाहरुख खानने केली चूक, भर कार्यक्रमात सांगितले बायकोचे चुकीचे वय

बॉलिवूडमध्ये नेहमीच एका जोडीची चर्चा रंगत असते, आणि ती जोडी म्हणजे शाहरुख खान आणि गौरी खान. या दोघांना ग्लॅमरचे एक वेगळे वलय असून ते नेहमीच कपल गोल्स देत असतात. शाहरुख सुपरस्टार असूनही गौरीने तिची एक हुशार आणि प्रतिभावान इंटिरियर डिझायनर अशी वेगळी ओळख निर्माण केली. आज तिची गिनती टॉपच्या इंटिरियर डिझायनर्समध्ये होते. नुकतेच गौरीने तिचे ‘माय लाईफ इन डिझाईन’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या प्रकाशनावेळी शाहरुख खानसह तिचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी शाहरुख खानने गौरीचे खूप कौतुक करत तिने तिचे करिअर कोणाच्याही मदतीशिवाय बनवले असल्याचे सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या कार्यक्रमामध्ये शाहरुख खानने गौरीची भरभरून स्तुती केली. यादरम्यान बोलता बोलता शाहरुख खानने चक्क त्याच्या बायकोचे वय चुकीचे सांगितले आणि त्यानंतर जे काही घडले त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शाहरुख खान बोलताना म्हणाला, “नवी सुरुवात करायला कुठल्याही वयाची मर्यादा नसते तिने तिच्या चाळीशीत नवी सुरुवात केली,” हे वाक्य म्हटल्यावर त्याने मोठा पॉज घेतला, आणि गौरीकडे पाहिले तेव्हा तिने त्याची चूक सुधारत चाळीशीमध्ये सुरुवात केल्याचे म्हटले आणि एकच हशा पिकल्या.

गौरी ही बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर असून, अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांची घरे डिझाइन केली आहे. गौरीने तिच्या सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात तिच्या घरातील ‘मन्नत’मधील अनेक अनसीन फोटो पाहायला मिळत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दिल तुम्हारा हो गया” या ‘अनलॉक जिंदगी’मधील गाण्यातून व्यक्त होणार मनातील ‘त्या’ हळुवार भावना
मराठमोळ्या तोऱ्यात रिंकू राजगुरूने चालवली गाडी, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा