Wednesday, July 3, 2024

आर्यन खानची रात्र कारागृहातच; सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला जामीन

सध्या बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान माध्यमांमध्ये झळकत आहे. त्याच्याबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच आता त्याच्याविषयी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आर्यनचा जामीन पुन्हा एकदा नवीन तारखेसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. बुधवारी (१३ ऑक्टोबर) सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आर्यनला आणखी एक रात्र कारागृहातच काढावी लागणार आहे. न्यायालयात वकील आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये (एनसीबी) चर्चा झाली, त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय पुढील दिवसावर ढकलला आहे.

जामीनावरील ही सुनावणी सत्र न्यायालयात जवळपास ३ वाजता सुरू झाली होती. यानंतर आर्यनच्या जामीनावर एनसीबी आणि आर्यनच्या वकिलाने युक्तिवाद सादर केले. ही सुनावणी सायंकाळपर्यंत चालली. खरं तर, आर्यन खानला ठेवण्यात आलेले आर्थर रोड कारागृह सायंकाळी ५.३० वाजता बंद होते. कारागृह बंद झाल्यानंतर आर्यनचा जामीन होणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे आता आर्यन खानच्या जामीनावर न्यायालय गुरुवारी (१४ ऑक्टोबर) आपला निर्णय सांगेल. (Shahrukh Khan Son Aryan Khan Bail Hearing Updated About Mumbai Curise Drug Case)

एनसीबीचा युक्तिवाद
एनसीबीने आर्यनच्या जामीनावर उत्तर दिल्यानंतर रिमांडमध्ये म्हटले की, या प्रकरणात एक आरोपीच्या भूमिकेला इतरांमार्फत समजवले जाऊ शकत नाही. जरी आर्यन खानकडे अं’मली पदार्थ सापडले नाही. मात्र, तो अं’मली पदार्थ विकणाऱ्याच्या संपर्कात होता. हा मोठा कट आहे. याचा तपास सुरू आहे. आर्यन खानवर कॉन्ट्राबँड खरेदी केल्याचा आरोप होता आणि हे कॉन्ट्राबँड अरबाज मर्चंटकडून जप्त करण्यात आले होते. परदेशात अं’मली पदार्थ व्यवहाराबाबत एनसीबीचा तपास सुरू आहे. या सुनावणीत आर्यनव्यतिरिक्त नुपूर सारिका, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, श्रेयस नायर, अविन साहू, आचित आणि मोहक जसवाल यांच्या जामीनावर सुनावणी होईल.

आर्यनच्या वकिलांची बाजू
आर्यनच्या वकिलांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना हे स्पष्ट केले की, आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे अं’मली पदार्थ सापडले नाहीत. त्याच्याकडे रोकडही सापडली नाही. आर्यन खान, मुनमुन धमेचालाही ओळखत नाही. एनसीबीने तिघांना क्रूझवरून अटक करत एकत्र सादर केले होते. मात्र, आर्यनचा मुनमुनशी कोणताही संबंध नाही.

अं’मली पदार्थ प्रकरणी अडकलेला आर्यन सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. त्याच्या जामीनासाठी त्याचे वकील मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, एनसीबीकडून काही ना काही आडकाठी केली जाते. ११ ऑक्टोबरलाही सत्र न्यायालयात आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, आता त्याच्या जामीनावर काय निर्णय घेतला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्यन खानचे प्रकरण या वकिलांकडे
आर्यन खानचे प्रकरण आतापर्यंत सतीश मानेशिंदे यांच्याकडे होते. मात्र, आता शाहरुख खानने वरिष्ठ वकील अमित देसाई यांना या प्रकरणासाठी नेमले आहे. अमित देसाई ११ ऑक्टोबरलाही मानेशिंदे यांच्यासोबत सत्र न्यायालयात दिसले होते. ते आर्यनच्या जामीनासाठी तिथे पोहोचले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानच्या चिंतेत शाहरुख आणि गौरी झाले हतबल, त्याला सोडवण्यासाठी करताय शर्थीचे प्रयत्न

-कार्तिक आर्यन साकारणार जगातील सर्वात गरीब ‘प्रिन्स’, पुन्हा एकदा सोबत दिसणार ‘ही’ क्यूट जोडी

-‘वडिलांचे कर्म लपवण्यासाठी आईने आत्महत्या केली’, नीना गुप्ता यांचा आत्मचरित्रातून धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा