Saturday, June 29, 2024

शाहरुख-गौरीच्या लग्नाच्या ३०व्या वाढदिवशी ‘या’ व्यक्तीने घेतली आर्यनची जेलमध्ये भेट

बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. मागील आठवड्यात गुरुवारी (२१ ऑक्टोबर) खुद्द शाहरुख आपल्या मुलाला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहोचला होता. कारागृहात जाण्याची ही शाहरुखची पहिलीच वेळ होती. इथे त्याने जवळपास १५ ते १८ मिनिटे आपल्या मुलाशी चर्चा केली होती. मात्र, आता शाहरुखनंतर त्याची पत्नी गौरी खानही मुलाला भेटायला पोहोचली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने कैद्यांना भेटण्यासाठी कुटुंबीयांना परवानगी दिली आहे. खरं तर, यापूर्वी कोरोनामुळे त्यांनी कुटुंबीयांना कारागृहात सोडण्यावर बंदी घातली होती.

आर्यनला ३ ऑक्टोबरला झाली होती अटक
एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका क्रूझवर सुरू असलेल्या अं’मली पदार्थ पार्टीवर छापा टाकला होता. त्यानंतर एनसीबीने ३ ऑक्टोबरला आर्यनसह इतर ८ लोकांनाही ताब्यात घेतले होते. त्यानंतरपासून आर्यन आर्थर रोड कारागृहात बंद आहे. (Shahrukh Khan Son Aryan Khan Drugs Case After King Khan Gauri Khan Arthur Road Jail To Meet Son Aryan)

मागील आठवड्यात फेटाळला होता जामीन
मागील आठवड्यात बुधवारी (२० ऑक्टोबर) मुंबईतील न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर आर्यनच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे आपला धाव घेतली होती. या प्रकरणात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) आर्यनच्या जामीनावर सुनावणी होणार आहे.

अनन्या पांडेचीही केली चौकशी
आर्यनशी चौकशी आणि त्याच्या व्हॉट्सऍप चॅटच्या आधारावर अभिनेत्री आणि चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेचीही एनसीबीने चौकशी केली. सन २०१८- १९ च्या चॅटच्या आधारे एनसीबीने अनन्याशी चौकशी केली होती.

शाहरुख- गौरीच्या लग्नाचे ३० वर्षे
सोमवारी (२५ ऑक्टोबर) शाहरुख आणि गौरीच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. हे जोडपे सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट काळातून जात आहेत. क्रूझवरील अं’मली पदार्थ प्रकरणात अडकल्यानंतर आर्यन आर्थर रोड कारागृहात मागील २ आठवड्यांपासून बंद आहे. सातत्याने प्रयत्न करूनही आर्यनला जामीन मिळत नाहीये.

अशातच मंगळवारी (२६ ऑक्टोबर) होणाऱ्या आर्यनच्या जामीनावर न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत

-जेव्हा अजय देवगणने पहिल्या भेटीतच काजोलला केले होते रिजेक्ट, तिला पुन्हा भेटायची नव्हती त्याची इच्छा

-राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; तर कंगणा, धनुष, मनोज बाजपेयी ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार

हे देखील वाचा