Monday, July 15, 2024

बॉलिवूडचा किंग खान ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याचा आहे जबरा फॅन, पोस्ट शेअर करत केले कौतुक

शाहरुख खान (Shahrukh Khan) हा हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. किंग खानने आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपट जगतावर अनेक दशके राज्य केले आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट होत असतो. म्हणूनच शाहरुख खान हिंदी चित्रपट जगतावर नेहमीच वर्चस्व गाजवत होतो.मात्र यशाच्या शिखरावर असलेला शाहरुख खान दुसऱ्या कलाकारांचेही कौतुक करत असतो. त्यामुळेच त्याच्या मोठेपणाचे नेहमीच कौतुक केले जाते. ज्या शाहरुख खानचे जगभरात असंख्य  चाहते आहेत तो किंग खान एका दिग्गज दाक्षिणात्य सुपस्टारचे कौतुक करताना दिसत आहे. या अभिनेत्याचा मी खूप मोठा चाहता असल्याचेही त्याने म्हणले आहे. 

अभिनेता शाहरुख खानने दाक्षिणात्य सुपरस्टार थालापती विजयचे तोंडभरुन कौतुक केले आहे. शाहरुख खानने थालापती विजयच्या ‘बीस्ट’ चित्रपटाच्या ट्रेलरचे तोंडभरुन कौतुक केले आहे. ज्याची पोस्ट त्याने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शाहरुख खानने “‘बीस्ट’च्या संपुर्ण टीमला शूभेच्छा. विजयच्या चाहत्यांसोबत बसलोय आणि मी सुद्धा त्याचाच चाहता आहे.” असे म्हणत चित्रपटाचे कौतुक केले आहे. सध्या त्याच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

शाहरुख खानच्या आधीही अनेकांनी विजयच्या ‘बीस्ट’चे कौतुक केले होते, मात्र किंग खानच्या ट्वीटनंतर एका चाहत्यानेही या दोन्ही कलाकारांना पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे दोन्ही स्टार्स एकत्र दिसणार की नाही हे येणारा काळच सांगेल, पण सध्या तरी प्रेक्षक ‘बीस्ट’च्या रिलीझची वाट पाहत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते वेडे झाले आहेत आणि आता चित्रपटगृहात आल्यानंतर ‘बीस्ट’ला दमदार ओपनिंग मिळणार असल्याचे दिसते. ‘बीस्ट’च्या पहिल्या ट्रेलर इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा चित्रपट या महिन्यात १३ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा