Saturday, March 14, 2026
Home बॉलीवूड शाहरुखचे अभिषेकबद्दल ‘ते’ वाक्य ऐकताच अशी होती अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया

शाहरुखचे अभिषेकबद्दल ‘ते’ वाक्य ऐकताच अशी होती अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया

बॉलिवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन आणि शाहरुख खान या दोघांनी फराह खान सोबत ‘हॅप्पी न्यू इअर’ नावाचाच सिनेमा केला आहे. या दोघांसोबतच या सिनेमात मुख्य भूमिकेत दीपिका पदुकोण, सोनू सूद, विवान शाह, बोमन इराणी हे देखील होते. जेव्हा जेव्हा सिनेमाचे शूटिंग होते तेव्हा ऑफ कॅमेरा अनेक मजेशीर गंमतीजमती घडत असतात, अनेक किस्से घडतात जे चित्राताची शूटिंग संपल्यानंतरही कायम स्मरणात राहतात. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुद्धा अनेक मजेशीर किस्से घडले असच एक किस्सा अभिषेक आणि विवान यांच्यासंदर्भात घडला होता. अभिषेक आणि विवान सेटवर खूप मस्ती करायचे आणि या चित्रपटाची दिग्दर्शिका असणाऱ्या फराह खानला खूप त्रास द्यायचे.

एक दिवस न राहून फराह खानने या दोघांची तक्रार शाहरुख खानकडे केली आणि त्याला सांगितले की, “हे मला खूप त्रास देतात सतत माझे फोटो काढतात आणि ट्विटरवर पोस्ट करतात. तर तू प्लिज त्यांच्याशी बोल आणि त्यांना समजाव.” यावर शाहरुखने तिला भरोसा दिला आणि सांगितले, “तू तुझे काम कर मी बोलतो त्यांच्याशी.” पुढे शाहरुख म्हणाला, “मी त्या दोघांकडे एकदम तयारी करून स्टाइलमध्ये गेलो. मी त्यांना बोलणार तेवढ्यात माझ्या मनात विचार आला की, अभिषेक हा महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा तर विवान हा दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शहा यांचा मुलगा. जर हे दोन महान अभिनेते त्यांच्या मुलांना काही शिकवू शकले नाही तर मी काय सांगणार.” शाहरुखने असे बोलल्यावर सर्वत्र एकच हशा पिकला.

जेव्हा शाहरुख आणि ‘हॅप्पी न्यू इअर’ची संपूर्ण टीम अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय अशा ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचली होती तेव्हा हा किस्सा शाहरुख खानने सर्वांसोबत शेअर केला होता. सध्या हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा