Wednesday, June 26, 2024

‘लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आले, पण…’, शाहरुखने भावुक होत सांगितलं सगळंकाही

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला एका वृत्तवाहिनीचा ‘इंडियन ऑफ द इयर’ हा पुरस्कार बुधवारी देण्यात आला. यावेळी त्याने 2023 वर्ष खूप वाईट ठरल्याचे आणि 2023मध्ये जीवनातही खूप प्रॉब्लेम सुरु असल्याचे सांगितले. परंतू त्याला या सगळ्या काळात अनेक गोष्टींनी मजबूत बनविल्याचे सांगितले.

सीएनएन न्युज १८ च्या मंचावर मिळाला नवीन चित्रपट
रूपेरी पडद्यावर जबरदस्त कमबॅक केल्यामुळे सीएनएन न्युज १८ कडून त्याला ‘इंडियन ऑफ द इयर’ (Indian Of The Year 2023) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात त्याने जेष्ठ निर्माते मणिरत्नम यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. याआधी त्यांनी १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल से .. ‘ (Dil se.. ) या चित्रपटात सोबत काम केलं होतं. पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ निर्माते मणिरत्नम (Maniratnam) यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत शाहरुख खानला लवकरच त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्याचं वचन दिलं.

म्हणाला खुप काही शिकवलं
शाहरूखने इंडियन फ द इयर 2023 पुरस्कार मिळवला आहे. हा पुरस्कार स्विकारताना त्याने जवळ जवळ १० मिनिटांचे हृदयस्पर्शी भाषण दिले.तो भावना व्यक्त करताना म्हणाला, मागील ४ वर्षे माझे चित्रपट सलग फ्लाॅप होत होते. काही फिल्म ऍनालिस्टस् च्या मतानुसार माझे करियर संपण्याच्या मार्गावर होते. माझ्या पर्सनल लाइफ मध्ये देखील खुप प्राॅब्लेम सुरु होते. पण याच गोष्टींनी मला मजबूत बनवलं आणि खुप काही शिकवलं. तो पुढे असंही

मानले चाहत्यांचे आभार
इंडियन ऑफ द इयर पुरस्कार स्विकारताना त्याने २०२३ मधे दिलेल्या सपोर्टबद्दल त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला मी इथे उपस्थित तसेच जे मला टीव्ही वर पाहत आहेत आणि जे यावर्षी माझे चित्रपट पहायला आले ,तुमच्यापैकी काहींना ते आवडले नाहीत परंतू तुम्ही मनापासून मला आणि माझ्या कुटुंबाला सपोर्ट केला. हा पुरस्कार त्याने त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) , मुलगी सुहाना (Suhana Khan), मुलगा आर्यन (Aaryan Khan )आणि अब्राम खान (Abram Khan) यांना डेडीकेट केले आणि सर्व चाहत्यांचे आभार मानले.

2023मध्ये एसआरकेची गाडी होती सुसाट

शाहरुख खानने(Shahrukh Khan) मोठ्या ब्रेकनंतर मागच्याच वर्षी पडद्यावर जोरदार कम बॅक केले. 2023 मध्ये त्याचे पाठोपाठ 3 चित्रपट सुपरहिट झाले. मागच्या वर्षी ‘पठान'(Pathan) सोबत शानदार सुरुवात करत, त्यानंतर ‘जवान’ (Jawan) आणि ‘डंकी’ (Dunki) या चित्रपटात तो दिसला. बाॅक्स ऑफिसवर 1000 करोडपेक्षाही जास्त कमाईने वर्षाची सुरुवात करत, शाहरूखने त्याच्या नावाचा डंका सर्वत्र वाजवला होता. तर वर्षाच्या शेवटपर्यंत जवान हा त्याचाच चित्रपट पटानला मागे टाकून बाॅक्स ऑफिसवर हिट ठरला.

हे देखील वाचा