Saturday, June 29, 2024

हे बघ भावा! शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यातील खोल्याच नाही, तर बाथरूमही आहे शानदार

बॉलीवूडमधील रोमान्स किंग शाहरुख खान याचे संपूर्ण जगभरात चाहते पसरलेले आहेत. शाहरुखची एक झलक बघण्यासाठी त्याचे चाहते त्याच्या घराबाहेर तासंतास उभे राहिलेले दिसतात. शाहरुख खान हा त्याच्या अभिनयासोबतच, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे देखील त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेत असतो, आणि यातील एक गोष्ट म्हणजे त्याचे घर. याचे कारण म्हणजे त्याच्या घराचे इंटेरियर आणि त्याच्या घराची सुंदरता. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असेल की, शाहरुख खानची पत्नी गौरी खान एक इंटिरिअर डिझायनर आहे. त्यामुळे ती तिचे घर वेगवेगळ्या पद्धतीने डिझाइन करत असते, आणि अशातच आत्ता सध्या शाहरुख खानच्या घरातील त्याच्या बाथरूमचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिचे काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हे फोटो तिने घरातील कोणत्या एरियामध्ये किंवा हॉलमध्ये, गार्डनमध्ये न काढता तिने चक्क तिच्या घराच्या बाथरूममध्ये काढले आहेत. तिने बाथरूममध्ये बसून वेगवेगळ्या पोज दिले आहेत. फोटो शाहरुख खानच्या घराच्या बाथरूमची भव्यता आणि बाथरूममधील अनेक गोष्टी बघून, प्रेक्षकांमध्ये सध्या शाहरुख खानच्या बाथरूमची चर्चा रंगली आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी गौरी खानने शाहरुख खानच्या ऑफिसचे फोटो शेअर केले होते. हे ऑफिस गौरीने स्वतःच्या डिझाईन केलेले आहे. हे फोटो शेअर करत गौरीने सांगितले होते की, “लॉकडाऊनमध्ये मला शाहरुखचे ऑफिस डिझाइन करण्यात खूप आनंद मिळाला.”

शाहरुख खान हा बॉलिवूडमध्ये त्याच्या अनेक रोमँटिक चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे, तसेच त्याने अनेक ॲक्शन फिल्ममध्ये देखील काम केले आहे. शाहरुख खानचा सगळ्यात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे.’ त्या काळात बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला होता. शाहरुख खान त्याच्या ‘लाल सिंह चड्डा’ या आगामी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू श्रीदेवीचे नाव खराब करत आहे’, जान्हवी कपूरने हॉट फोट शेअर करताच नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

-लाखात एक भेट! पती डॅनियलकडून लग्नाच्या १० व्या वाढदिवशी सनी लिओनीला खास गिफ्ट, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

-‘समाजाला तुमच्यासारख्या आईची गरज…’, अनन्या पांडेच्या बहिणीने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा हॉट फोटो, आईच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष

हे देखील वाचा