बॉलिवूडमधील किंग खान शाहरुख खान आज जेवढा प्रसिद्ध आहे तेवढीच प्रसिद्ध त्याची मुलगी सुहाना देखील आहे. तिने अजून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नाही. मात्र, तरीही तिचे फॅन फॉलोविंग कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नाही. बॉलिवूडमध्ये नसली तरी देखील सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावरील बोल्ड फोटोमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सुहाना ही नुकतीच 21 वर्षांची झाली आहे. यानंतर लगेच तिला लग्नासाठी मागणी आली आहे.
सुहानाने काही दिवसांपूर्वी तिचा वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्ताने तिची आई गौरी खानने सुहानाचा एक सुंदर फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या होत्या. हा फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हॅप्पी बर्थडे, मी नेहमीच तुझ्यावर खूप प्रेम केले आहे.”
Happy birthday.. you are loved today , tomorrow and always ❤️ pic.twitter.com/dgXRGjk8FK
— Gauri Khan (@gaurikhan) May 21, 2021
सुहानाच्या वाढदिवशी तिच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु गौरी खानने शेअर केलेल्या या फोटोवरील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका ट्विटर युजरने कमेंट केली होती की,”गौरी मॅम मला सुहाना सोबत लग्न करायचे आहे. माझा महिन्याचा पगार एक लाखांपेक्षाही जास्त आहे.”
सुहानाच्या वाढदिवशी तिची खास मैत्रिणी शनाया कपूरने एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना, शनाया आणि अनन्या सोबत डान्स करताना दिसत आहेत. तिने न्यूयार्कमध्ये तिच्या मित्रांसोबत तिचा वाढदिवस साजरा केला आहे. याचे सगळे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. मागच्या वर्षी तिने तिचे सोशल मीडिया अकाऊंट सार्वजनिक केले आहे. त्यानंतर तिचे फॅन फॉलोविंग खूप वाढले आहे. सुहानाला तिच्या बोल्ड फोटोमुळे अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…