Wednesday, March 19, 2025
Home अन्य आहा! होळीच्या दिवशी पत्नी गौरीसोबत डान्स करतानाचा शाहरुख खानचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच

आहा! होळीच्या दिवशी पत्नी गौरीसोबत डान्स करतानाचा शाहरुख खानचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच

बॉलिवूडमधील ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खान त्याच्या चित्रपटातील रोमँटिक अंदाजासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्येक अंदाज वेगळा असतो आणि सर्व प्रेक्षकांना देखील त्याचा अंदाज आवडत असतो. सोशल मीडियावर त्याचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ अपलोड होता क्षणीच व्हायरल होत असतो. होळीच्या दिवशी शाहरुख खानचा एक थ्रोबॅक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख त्याची पत्नी गौरी आणि मित्रांसोबत होळी खेळताना दिसत आहे.

शाहरुख खानचा हा व्हिडिओ 2000 या वर्षीचा आहे, अशी सर्वत्र चर्चा चालू आहे. यामध्ये बघू शकता की, शाहरुख खानचे सगळे मित्र त्याला धरून एका पूलमध्ये टाकतात. थोड्या वेळाने किंग खान त्यांच्या अंगावर रंग टाकताना दिसत आहे. एवढंच नाही, तर नंतर गौरी आणि शाहरुख होळीच्या गाण्यावर जोरदार डान्स करताना देखील दिसत आहे. या व्हिडिओला लेहरे रेट्रो यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 30 लाखांपेक्षाही जास्त वेळा बघितले गेले आहे.

या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि गौरी खानसोबतच सुभाष घई, चंकी पांडे, सतीश कौशिक हे होळी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सुभाष घई यांनी शेअर केला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच सगळेजण या व्हिडिओला खूप प्रेम देत आहे.

शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो या दिवसात त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपिका आणि शाहरुख खान यांचा हा चौथा एकत्र केलेला चित्रपट आहे. या आधी त्या दोघांनी ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हरियाणवी गायिका रेणुका पवारच्या गाण्याने वाढवला यूट्यूबचा पारा, व्हिडिओत दिसतेय एकदम कडक

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

हे देखील वाचा