Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड अबरामच्या वाढदिवशी थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल; वडील शाहरुख खानसोबत लावले जोरदार ठुमके

अबरामच्या वाढदिवशी थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल; वडील शाहरुख खानसोबत लावले जोरदार ठुमके

बॉलिवूडमधील स्टारकीड नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये स्टार्सला जेवढी लोकप्रियता आहे तेवढीच लोकप्रियता आज त्यांच्या मुलांना मिळालेली दिसत आहे. या यादीत सर्वात जास्त लोकप्रिय आहे तो म्हणजे शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम खान. गुरुवारी (२७ मे) त्याचा ८ वा वाढदिवस साजरा केला. अबराम दिसायला जेवढा गोड आहे तेवढाच तो मस्तीखोर देखील आहे. सगळ्यात लहान असल्याने तो सर्वांचा लाडका आहे. तो आता शाहरुख खानसोबत डान्स करताना दिसत आहे. या डान्समध्ये बाप लेकाची जबरदस्त बॉंडिंग पाहायला मिळत आहे. खरं तर अबराम खानचा हा डान्स व्हिडिओ मागील वर्षीचा आहे जो सध्या खूप व्हायरल होत आहे.

मागच्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा केली होती, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान एक रॉकस्टार बनलेला दिसत आहे. यामध्ये तो गाणे गात आहे की, ‘वेळ किती वाईट आहे. आता एसआरके गायक देखील झाला आहे. लॉकडाऊनमध्ये हे देखील बघायला मिळू शकते.’ त्याने गायलेल्या या गाण्यावर अबरामने चांगलाच ठेका धरला आहे. फोटोग्राफर वायरल भयानीने हा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे.

अबरामचा जन्म 8 वर्षापूर्वी सरोगसीद्वारे झाला आहे. तो नेहमीच त्याच्या आई- वडिलांसोबत दिसत असतो. पॅपराजी त्याला कॅमेरामध्ये कैद करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. जेव्हा अबराम शाहरुख खानच्या ‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटात दिसला होता, तेव्हा तो केवळ 1 वर्षाचा होता.

सुहाना खानने तिचा भाऊ अबराम सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये भावा बहिणी मधील प्रेम दिसत होते. यामध्ये ते दोघे एकमेकांप्रती असलेले प्रेम दाखवत आहे. सुहाना देखील सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे ती खूप चर्चेत असते. आता काही दिवसांपूर्वी तिने न्यूयार्कमध्येमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला होता. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा