Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड मोठी बातमी! आर्यन खान आर्थर रोड कारागृहातून बाहेर, लवकरच होणार मन्नतवर रवाना

मोठी बातमी! आर्यन खान आर्थर रोड कारागृहातून बाहेर, लवकरच होणार मन्नतवर रवाना

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा गेल्या २६ दिवसांपासून अं’मली पदार्थांचे सेवन आणि देवाण-घेवाण केल्याप्रकरणी आर्थर रोड कारागृहात होता. त्याच्या जामीनासाठी अनेक प्रयत्न केले होते. तरी देखील कोर्टाकडून त्याला वारंवार जामीन नाकारला जात होता. अशातच शनिवारी (३० ऑक्टोबर) आर्यन खानची सुटका झाली आहे. दोन दिवसापूर्वी म्हणजेच गुरुवारी (२८ ऑक्टोबर) रोजी त्याचा जामीन मंजूर झाला होता. तरी देखील दोन दिवस त्याला कारागृहात राहावे लागले होते.

अशातच आर्यनला घरी सोडल्याची बातमी आली आहे. शाहरुख खानचे कुटुंब गेल्या महिन्याभरापासून आर्यनसाठी खूप चिंतेत होते. शाहरुखने त्याच्या जामीनासाठी सुरुवातीला सतीश मानेशिंदे या वकिलांची नियुक्ती केली होती. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश न आल्याने शाहरुख खानने अमित देसाई यांना नेमले. अनेक प्रयत्न करून देखील आर्यनची या घटनेतून सुटका होत नव्हती. याबाबत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आर्यनला पाठींबा दिला होता.

तसेच आता देखील त्याला जामीन मिळाल्यानंतर सगळे खुश झाले आहेत. आर्यनच्या जामीनासोबत आर्यन समोर कोर्टाने ११ अटी ठेवल्या आहेत. त्या अटींचे जर त्याने पालन केले तरच त्याला जामीन मिळेल असे सांगितले होते. आर्यनने त्या ११ अटी मान्य केल्या आहेत आणि तो आता त्याच्या घरी मन्नतवर रवाना होणार आहे. (Shahrukh Khan’s son Aryan Khan get bail, he will go to his home mannat)

रविवारी (३ ऑक्टोबर) आर्यनला अटक करण्यात आली होती. मुंबईच्या किनारपट्टीवर शनिवारी (२ ऑक्टोबर) एका क्रूझ शिपमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकजण सहभागी होते. अशातच येथे रात्री पोलिसांची धाड पडली. पोलिसांना तेथे काही अमली पदार्थ सापडले. या सर्वांमध्ये शाहरुख खानच्या मुलाला देखील एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्याच्यासोबत आणखी आठ जणांना देखील अटक करण्यात आले होते. तसेच आर्यनचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील ताब्यात घेतले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी

-हीच ती वकिलांची टीम ज्यांनी आर्यनला मिळवून दिला जामीन, जाणून घ्या या टीममधील सदस्यांबद्दल

-‘अशी’ होती जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया, वाचा कर्मचाऱ्यांसह कैद्यांना काय म्हणाला?

हे देखील वाचा