Monday, July 1, 2024

गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

एका सामान्य व्यक्तीपासून ते एक सुपरस्टार बनणे ही काही सोप्पी गोष्ट नाहीये. त्यासाठी कितीतरी रात्री जागून काढाव्या लागतात. अनेक दुःख, यातना, अपमान सहन करून जो या क्षेत्रात तग धरून राहतो तोच शेवटपर्यंत टिकतो. असाच अनेक संकटांचा सामना करून आज यशाच्या शिखरावर पोहचलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे शाहरुख खान. आज त्याला बॉलिवूडमधील रोमान्सचा बादशाह अशी ओळख मिळाली आहे. पण त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याच्या या यशात त्याच्या पत्नीचा देखील मोलाचा वाटा आहे. प्रत्येक प्रसंगात गौरी शाहरुख खानसोबत उभी राहिली आहे. मुलांचे पालन-पोषण करत तिने प्रत्येक प्रसंगात शाहरुख खानला साथ दिली आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण त्यांनी मात्र एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्यांना बॉलिवूडमधील एक यशस्वी जोडपे मानले जाते. गौरी शाहरुख खानच्या चित्रपटावरून अनेकवेळा तिचे मत व्यक्त करत असते.

गौरी खान एकदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय शोमध्ये गेली होती. तेव्हा गौरीने करणच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, “जर त्याने एखाद्या चित्रपटात चांगले काम नाही केले, तर मला कौतुक करण्याची काही गरज नाहीये. जर त्याने खराब काम केले आहे, तर ही गोष्ट मान्य करायला पाहिजे. एक प्रेक्षक म्हणून मला असं वाटत आहे की, त्याने जर ओव्हरअक्टिंग केली. त्याने चांगलं काम नाही केले तर ते सांगणे माझे कर्तव्य आहे.” (Shahrukh Khan’s wife Gauri khan said shakti the power was worst movie on karan johar show)

गौरी खानचे हे उत्तर ऐकून करण जोहर म्हणाला की, “अशा चित्रपटांची नावं सांग ज्यातील शाहरुख खानचे काम न आवडल्याने तू त्याला सांगितले होते.” यावर गौरीने सांगितले की, “मी त्याचे जास्त खराब चित्रपट नाही पाहिले आणि मला लक्षात देखील नाहीये. जसे की, ‘गुड्डू’, ‘इंग्लिश बाबू और देसी मेम’. हे ऐकून करण म्हणाला की, ‘शक्ती : द पॉवर’ हे ऐकून गौरी म्हणाली की, “हो त्याला टॉलरेट करणे अवघड होते. त्यामध्ये त्याचा अभिनय खूप खराब होता.”

शाहरुख खानचा ‘शक्ती : द पॉवर’ हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत करिश्मा कपूर होती. तसेच कृष्णा वामसी यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात नाना पाटेकर आणि संजय कपूर हे देखील होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्युटी इन ब्लॅक!’ सोनाक्षी सिन्हाच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती

-प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये नेहा कक्करचा मोठा निर्णय; या कारणामुळे ‘इंडियन आयडल’च्या फिनालेमध्येही नाही दिसणार गायिका

-राजकुमार राव- राधिका आपटे नेटफ्लिक्सवर झळकणार एकत्र; ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा पहिला लूक आला समोर

हे देखील वाचा