Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

शौक बडी चीज है! महागड्या घड्याळांचे शौकीन आहेत ‘हे’ अभिनेते, किंमत वाचून व्हाल थक्क

प्रत्येकाच्या मनात हा विचार नेहमी सतावत असतो की, बाॅलिवूड कलाकार इतके सुंदर कशामुळे दिसतात. त्यांच्या सुंदर दिसण्याचं नेमक कारण काय? अनेक चाहते त्यांच्या सारखं राहण्याचा प्रयत्न करत असतात. महत्त्वाचं म्हणजे, कलाकारही त्यांची स्टाईल आणि लूक सुंदर ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. कपडे, शूज, ग्लासेस, ऍक्सेसरीज, घड्याळे या सर्व गोष्टींची कलाकारांना प्रचंड आवड असते.

अनेकदा आपल्या मनात असा प्रश्न येतो की, कलाकार वापरत असलेल्या घड्याळांची किंमत किती असेल? तुम्हाला माहित असेल बॉलिवूड कलाकारांनी घातलेली घड्याळे खूप महाग आणि खास असतात. या घड्याळांची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण ते तुमच्या विचारांपेक्षा अधिक महाग आहेत. आज या लेखात महागड्या घड्याळांचा जबरदस्त संबंध असलेल्या बॉलिवूडच्या पाच कलाकारांबद्दल जाणून घेऊयात.

शाहरुख खान
बॉलिवूडचा ‘बादशाह’ अर्थात शाहरुख खानला रोलेक्स घड्याळे खूप आवडतात. त्याच्याकडे रोलेक्सचे तीन महागडी अल्ट्रा प्रीमियम घड्याळे आहे. त्याच्याकडे दोन रोलेक्स डेटोना घड्याळे आहेत. ज्याची किंमत १,१६,५२० आहे. त्या घड्यांचा रंग राखाडी आहेत. पण दोन्ही घड्याळाच्या डायलचा रंग वेगवेगळा आहे. या एका घड्याळाची किंमत ८.५१ लाख रुपये आहे. ही घड्याळे जुनी आणि अत्यंत दुर्मिळ आहेत. आज या दोन्ही घड्याळाची किंमत दुप्पटीने वाढली आहे. तर शाहरुखकडे तिसरे घड्याळ रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना आहे. या घड्याळाची किंमत १०.६९ लाख रुपये आहे.

आमिर खान
आमिर खानकडे जगातील सर्वात महाग आणि खास घड्याळे आहेत. त्याचे नाव Vacheron Constantin ओव्हरसीज वर्ल्ड टाइम आहे. सिल्वर आणि निळ्या रंगाचे हे घड्याळ ३७ वेगवेगळे टाइम झोन दाखवते. त्याची किंमत २७.८० लाख रुपये आहे.

सैफ अली खान
नवाब कुटुंबातील सैफ अली खानला महागड्या घड्याळांची खूप आवड आहे. त्याच्याकडे Lange, Söhne Lange आणि Grande Lange 1, ‘Luminous’ white gold घड्याळे आहेत. या घड्याळांची किंमत २४.९३ लाख आणि १४.४० लाख रुपये आहे.

रणवीर सिंग
रणवीर सिंगला त्याच्या फॅशनसाठी ओळखले जाते. रणवीरकडे Frank Müller V45 व्हॅनगार्ड नौका रोझ गोल्ड आणि डायमंड घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत ४० लाख रुपये आहे.

रणबीर कपूर
कपूर घराण्याचा रणबीरकडे ३ महागड्या घड्याळे आहेत. पहिले घड्याळाचे नाव Audemars Piguet Roya आहे ज्याची किंमत १३ लाख रुपये आहे.

तर दुसरे Ressence Type 1 घड्याळ आहे. ज्याची किंमत १४.१८ लाख रुपये आहे. त्याच्याकडे असलेले तिसरे घड्याळ रिचर्ड मिल RM028 ऑटोमॅटिक रोज गोल्ड डायव्हर आहे. या घड्याळाची किंमत १.१२ कोटी रुपये आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा