शैलेश लोढा अर्थात सर्वांची आवडती मालिका असलेल्या ‘तारक मेहता का उलट चश्मा’ मालिकेत पूर्वी तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते. शैलेश यांना मालिकेत काम करत असताना एवढी लोकप्रियता मिळाली नाही, जेवढी त्यांनी ती मालिका संपल्यानंतर मिळवली आहे. मालिका सोडून शैलेश यांना बराच काळ झाला असला, तरी त्यांच्यात आणि निर्मात्यांमध्ये सुरु असलेला वाद काही शमण्याचे नाव घेत नाही. निर्माते असित मोदी आणि शैलेश यांच्यात वाद असल्याने शैलेश यांनी ही मालिका सोडली होती. मध्ये मध्ये अनेकदा त्यांच्यात खटके उडत असल्याच्या बातम्या येत असतात.
मात्र आता शैलेश लोढा यांनी असित मोदी आणि त्यांच्या प्रोडक्शन कंपनीच्या विरोधात केस दाखल केली आहे. शैलेश लोढा यांनी तब्बल १४ वर्ष तारक मेहता मालिकेत काम केले. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये ते आणि असित मोदी यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यांनी शो सोडला. रिपोर्ट्सनुसार शैलेश यांचे जवळपास एक वर्षाचे मानधन अजूनही दिले गेलेले नाही. ६ महिने वाट पाहिल्यानंतर आता शैलेश लोढा यांनी असित मोदी यांच्या प्रोडक्शन कंपनीविरोधात कायदेशीर मार्गाने जाण्याचा पर्याय निवडला आहे.
शैलेश लोढा यांनी त्यांना वेळेत त्यांचे मानधन न मिळाल्याने असित मोदी यांच्या प्रॉडक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शैलेश यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल जात कलम ९ अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणावर मे महिन्यात सुनावणी केली जाणार आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने मी आता यावर बोलणार नसल्याचे शैलेश यांनी सांगितले.
दरम्यान, असित मोदी यांनी देखील यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. परंतु या शोचे प्रोजेक्ट हेड असलेल्या सोहिल रमाणी यांनी सांगितले, “आम्ही शैलेश यांना मेल आणि फोनद्वारे आवश्यक सर्व कागतपत्रांची पूर्तता करण्याची आणि त्यांचे उर्वरित मानधन घेऊन जाण्याची विनंती केली होती. आम्ही त्यांना त्यांचे मानधन देण्यास कधीच नाही म्हटले नाही. प्रत्येक कंपनीत नोकरी सोडल्यानंतर काही पेपरवर्क करून मगच उर्वरित पगार दिला जातो. त्यांनी तक्रार करण्यापेक्षा पद्धत फॉलो करायला पाहिजे होती.” आता यावर काय निर्णय येतो ते पाहणे महत्वाचे असेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुःखद! यश चोप्रा यांच्या पत्नी आणि जेष्ठ गायिका पामेला चोप्रा यांचे निधन
बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसवर आणि निर्मात्यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाची छापेमारी