Tuesday, March 24, 2026
Home मराठी ‘डान्स आवडला का डान्स करणारी?’ ‘शाळा’ वेब सीरिज फेम अनुश्री मानेच्या डान्सने पाडली नेटकऱ्यांना भुरळ; पाहा व्हिडिओ

‘डान्स आवडला का डान्स करणारी?’ ‘शाळा’ वेब सीरिज फेम अनुश्री मानेच्या डान्सने पाडली नेटकऱ्यांना भुरळ; पाहा व्हिडिओ

लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद आहेत. अशावेळी ओटीटी प्लॅटफॉर्मला जास्त प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांकडूनही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटला विशेष प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वेब चित्रपट असो वा वेब सीरिज यांची लोकप्रियता तर या दिवसांत शिगेला पोहोचत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

आजपर्यंत आपण खूप वेब सीरिज पाहिल्यात आहेत. यातील एक म्हणजे ‘शाळा’ वेब सीरिज. आशिष श्रावणी दिग्दर्शित या सीरिजला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे या शोमुळे यातील कौशल जाधव आणि अनुश्री माने या कलाकारांनाही बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. अनुश्री मानेबद्दल बोलायचे झाले, तर ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सतत आपले नवनवीन व्हिडिओ शेअर करून, ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांनाही भुरळ पडली आहे.

अनुश्री मानेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. लाल साडीमधील तिचे आश्चर्यकारक मुव्हज पाहून, जो तो तिचे कौतुक करत आहे. केवळ डान्सच नव्हे, तर तिचे एक्सप्रेशन्स देखील अगदी पाहण्यासारखे आहेत.

अनुश्रीच्या या पोस्टमध्ये आणखी एक लक्षवेधी बाब आहे, ती म्हणजे या व्हिडिओचे कॅप्शन. हा डान्स व्हिडिओ शेअर करत, तिने कॅप्शनमध्ये चाहत्यांना प्रश्न विचारला आहे की, “डान्स आवडला का डान्स करणारी आवडली!” या प्रश्नाचे उत्तर देत, नेटकरी कमेंट्स अन् लाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडत आहेत. यापूर्वीही तिने याच लूकमध्ये डान्स व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओलाही चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा