Wednesday, March 25, 2026
Home मराठी बोल्ड एँड ब्युटीफुल! ‘शाळा’ वेबसीरिज फेम अनुश्री मानेच्या हॉट फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

बोल्ड एँड ब्युटीफुल! ‘शाळा’ वेबसीरिज फेम अनुश्री मानेच्या हॉट फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

माणसांच्या आधीच्या काळात तीन मूलभूत गरजा होत्या, अन्न, वस्त्र आणि निवारा. मात्र, आजच्या काळात यात कदाचित सोशल मीडिया ही देखील एक गरज जोडायला पाहिजे. सोशल मीडियाचा आजच्या काळात लोकांवर प्रचंड मोठा पगडा आहे. सामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. आजच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जणं सोशल मीडियावर सक्रिय आहेत. कलाकार देखील स्वतःचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. आता तर सोशल मीडियावर लोकांची प्रसिद्धी आणि लोकप्रियता पाहून त्यांना अभिनयाच्या ऑफर दिल्या जातात. इतके सोशल मीडिया महत्त्वाचे ठरत आहे.

अशीच एक सोशल मीडिया सेन्सेशन असलेली कलाकार म्हणजे अनुश्री माने. ‘शाळा’ वेबसीरिज फेम अनुश्री माने सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय आहे. ती नेहमी तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ब्युटी विथ ब्रेन असणारी अनुश्री सध्या खूपच गाजत आहे. अनुश्रीला सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहे. अनुश्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यातल्या एका फोटोमध्ये अनुश्रीने काळ्या रंगाचा ऑफ स्लीव्जचा टॉप आणि डेनिम शॉर्ट्स घातले आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिले, “मी अशा व्यक्तीचा आदर करते, जो मी आजूबाजूला नसताना देखील माझा आदर करतो.” या फोटोमध्ये अनुश्री ग्लॅमरस दिसत असून तिची नजर लक्षवेधी ठरत आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये अनुश्रीने गुलाबी रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. या फोटोमध्ये तिची डार्क शेडची लिपस्टिक आकर्षक दिसत असून, हा फोटो शेअर करताना तिने लिहिले, “मनाची शांती जाणवून घ्या.”

तिसऱ्या फोटोमध्ये अनुश्रीचा बोल्ड अवतार दिसत आहे. या फोटोंमध्ये ती गुलाबी रंगाच्या टॉवेलमध्ये दिसत असून, यातच तिने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. या फोटोंमधून ती तिचे टॅटू देखील फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

चौथ्या आणि पाचव्या फोटोमध्ये पुन्हा तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या आणि जिलबी रंगाचा शॉर्ट टॉप घातलेला आहे. या फोटोंमधून तिचा कमनीय बांधा लोकांना खूपच आकर्षित करत आहे.

अनुश्रीचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले तर समजेल की ती वेस्टर्न ड्रेससोबतच पारंपरिक ड्रेसमध्ये देखील तितकीच सुंदर दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकिनी अन् दोन वेण्या घालून अभिनेत्री मोनालिसाने केले मालदीवमधील फोटो शेअर, पतीही दिसला शर्टलेस

-‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

हे देखील वाचा