Tuesday, July 9, 2024

शाल्मली खोलगडेच्या लग्नातील वरमाळेने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हे काय नवीनच?’

या वर्षी सिनेसृष्टीतून अनेक आनंदाच्या बातम्या आल्या आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी गायिका शाल्मली खोलगडेने (Shalmali Kholgade) तिचा प्रियकर फरहान शेखसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिने २२ नोव्हेंबर रोजी लग्न केले आहे. त्यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फरहान आणि शाल्मली गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी लग्न तर अगदी साध्या पद्धतीने केले, परंतु त्यांच्या लग्नातील वरमाळेने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शाल्मली आणि फरहानने ज्या वरमाळा घातल्या आहेत, त्यात त्यांनी गेल्या सहा वर्षांत त्यांच्या नात्यात घडलेल्या अनेक खास क्षणाचे फोटो या वरमाळेत दिसत आहेत. त्यांच्या या वरमाळेची सर्वत्र चर्चा चालू आहे. फरहान हा मिक्सिंग आणि मास्टरिंग इंजिनिअर असून, हे दोघे मागील सहा वर्षांपासून नात्यात होते. शाल्मली आणि फरहानने त्यांचे लग्न अतिशय गुप्त ठेवले. १ डिसेंबर, २०२१ रोजी ते इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रपरिवारासाठी खास रिसेप्शन आयोजित करण्याची त्यांनी ठरवले आहे. (Shalmali Kholgade ties the knot with Farhan Shaikh check out their varmala)

हाती आलेल्या माहितीनुसार, शाल्मली आणि फरहान यांना कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अतिशय खाजगी पद्धतीने हा समारंभ साजरा करण्याची इच्छा होती. आधी त्यांना फक्त नोंदणीकृत विवाह करण्याची इच्छा होती. मात्र, पालकांच्या आनंदासाठी त्यांनी घरच्या घरी काही विधी केल्या आहेत. लग्नाच्याच दिवशी त्यांनी साखरपुडा देखील केला. या सोहळ्याला केवळ १५ लोकं उपस्थित होती. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या शाल्मली आणि फरहान यांच्या फोटोंमध्ये सर्वांचेच लक्ष त्या दोघांनी घातलेल्या माळांनी वेधून घेतले. त्यांच्या गळ्यात असलेल्या माळांमध्ये कागदी फुलांसह त्या दोघांचे काही फोटो गुंफलेले होते. अतिशय सध्या पोशाखात या दोघांनी लग्न केले आहे.

शाल्मलीबद्दल सांगायचे झाले, तर ती एक प्रसिद्ध गायिका आहे. तिने ‘इशकजादे’ सिनेमातील ‘परेशान’, ‘दारू देसी’, ‘बलम पिचकारी’ आदी अनेक हिट गाणी गायली आहेत. तिने म्युझिक रियॅलिटी शो, ‘इंडियन आयडल ज्युनिअर’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये परीक्षकाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा