Monday, October 27, 2025
Home मराठी ‘हाय मेरी परम सुंदरी’, म्हणत ‘ओम’ने केला त्याच्या खऱ्या आयुष्यातील ‘स्वीटू’सोबतचा फोटो शेअर

‘हाय मेरी परम सुंदरी’, म्हणत ‘ओम’ने केला त्याच्या खऱ्या आयुष्यातील ‘स्वीटू’सोबतचा फोटो शेअर

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील हँडसम आणि डॅशिंग अभिनेता शाल्व किंजवडेकर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या मालिकेतील त्याचा अभिनय तर सर्वांना आवडत आहेच, पण त्याच्या लूकची देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू असते. ही मालिका सुरू होऊन जेमतेम काही महिने झाले आहेत, पण मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात त्यांचे अढळ असे स्थान निर्माण केले आहे. ऑनस्क्रीन ओम आणि स्वीटूची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडते. मात्र, तुम्ही त्याच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटूला पाहिले आहे का? ओमने म्हणजेच शाल्वने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एक फोटो शेअर केला आहे.

शाल्वने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याची गर्लफ्रेंड श्रेया डाफळापूरकरसोबतचा फोटो शेअर केला आहे. शाल्वने त्या दोघांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते दोघेही खूप खुश दिसत आहेत. श्रेया खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने एक कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “हाय मेरी परम सुंदरी.”

त्यांचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहे. या फोटोवर अन्विता फलटणकर हिने “प्रेम,” असे लिहून हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. तर शाल्वची गर्लफ्रेंड श्रेया डाफळापूरकर हिने “तुला खूप जास्त मिस करत आहे” ही कमेंट केली आहे. त्याच्या एका चाहत्याने “नेहमी असेच एकत्र राहा” अशी कमेंट केला आहे, तर काहीजण त्याला त्याच्या मालिकेबद्दल प्रश्न विचारत आहेत.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत शाल्वसोबत अभिनेत्री अन्विता फलटणकर प्रमुख भूमिकेत आहे. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत होती. मात्र मागील काही दिवसांपासून स्वीटूचे मोहितसोबत लग्न झाल्याने प्रेक्षक संताप व्यक्त करत आहेत. मालिकेत हे वळण प्रेक्षकांना अजिबात आवडले नाही. त्यामुळे ही मालिका जबरदस्त ट्रोल होत आहे. (shalv kinjawadekar share a photo with her real life girlfriend)

शाल्वने याआधी सहाय्यक अभिनेता म्हणून देखील चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘हंटर’, ‘मेड इन हेवन’, ‘बकेट लिस्ट’, ‘एक सांगायचंय’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकिनी अन् दोन वेण्या घालून अभिनेत्री मोनालिसाने केले मालदीवमधील फोटो शेअर, पतीही दिसला शर्टलेस

-‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

हे देखील वाचा