Friday, July 5, 2024

‘अश्लील चित्रफित प्रकरणी मला विनाकारण गोवण्यात आले’, म्हणत शमिता शेट्टीने व्यक्त केला संताप

 

प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला नुकताच अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात राज कुंद्राला 2 महिने जेलची हवा खावी लागली. या संपूर्ण प्रकरणामुळे शिल्पाला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. शिल्पा शेट्टीसह तिची छोटी बहीण शमिता शेट्टीला ही मोठ्या प्रमाणावर टीकेला तोंड द्यावे लागले. या संबंधित अलीकडेच शमिता शेट्टीने या संपूर्ण प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आल आहे.

या बाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी अभिनय क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण करू शकली नसली तरी शिल्पा शेट्टीमूळे ती चांगलीच चर्चेत असते. अलीकडेच तिने तिसर्‍यांदा बिग बॉसच्या शोमध्ये सहभाग घेतला आहे. बिग बॉसच्या तिसर्‍या पर्वातून तिला शिल्पा आणि राज कुंद्राच्या लग्नामुळे माघार घ्यावी लागली होती. दुसर्‍या वेळी ती बिग बॉस OTT मध्ये सहभागी झाली होती. आणि यावेळी ती बिग बॉसच्या १५ व्या पर्वात सहभागी होत आहे.

https://www.instagram.com/p/CKxPwR7Avzo/?utm_source=ig_web_copy_link

यावेळी एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना शमिता म्हणाली की, “राज कुंद्रा प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना मला उगाच यात गोवण्यात आले. ज्यामुळे मला नाहक त्रास सहन करावा लागला. बिग बॉसच्या पहिल्या फेरीत राज कुंद्रा प्रकरणामुळे मला विनाकारण ट्रोल केल गेल.” या सर्व गोष्टींमुळे प्रचंड त्रास झाला असही ती म्हणाली. इंडस्ट्रीमध्ये कोणताच प्रोजेक्ट मिळत नसताना बिग बॉसच्या प्रवेशामुळे ती खुश असल्याच ही तिने या वेळी सांगितले.

दरम्यान बिग बॉस OTT मध्ये तिच्या आणि राकेश बापटच्या संबंधाची चांगलीच चर्चा रंगली होती. बिग बॉस OTT मध्ये दोघांमधील जवळीकता चांगलीच वाढली होती. या दोघांच्या जोडीला चाहत्यांकडून ही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच राकेशने शमिता सोबतचा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे अधिकच चर्चांना उधाण आले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा