Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘शमशेरा माझ्यासाठी भयानक स्वप्न’, अभिनेता रणबीर कपूरचे त्याच्याच सिनेमाबाबत खळबळजनक वक्तव्य

‘शमशेरा माझ्यासाठी भयानक स्वप्न’, अभिनेता रणबीर कपूरचे त्याच्याच सिनेमाबाबत खळबळजनक वक्तव्य

अभिनेता रणबीर कपूर याच्या ‘शमशेरा‘ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. २२ जुलै, २०२२ रोजी प्रदर्शित होणार असलेल्या या सिनेमाने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेत आहे. ‘शमशेरा’च्या भूमिकेत येण्यासाठी रणबीरने खूप मेहनत घेतली आहे. याचा त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने एका मुलाखतीत म्हटले आहे की, ‘शमशेरा’ (Shamshera) या आगामी चित्रपटात काम करणे त्याच्यासाठी भयानक स्वप्नसारखे होते. तो म्हणाला, “चित्रपटाने मला आणि सहअभिनेत्री वाणी कपूरला शारीरिकरीत्या थकवले. मुंबईच्या उन्हात आम्ही लोकरीच्या कपड्यात शूटिंग करत धुळीने माखलो होतो.”

रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लव्ह रंजनच्या एका चित्रपटात तो झळकणार आहे. यामध्ये तो श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. यासोबतच करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘ऍनिमल’ असे त्याचे चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा