Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड सुपरस्टार अनिल कपूरची पुतणीही लवकरच करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण, पाहा तीचे ग्लॅमरस फोटो

सुपरस्टार अनिल कपूरची पुतणीही लवकरच करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण, पाहा तीचे ग्लॅमरस फोटो

जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’मध्ये शनाया कपूरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ती लवकरच चित्रपटांमध्ये दिसू शकते अशी चर्चा आहे. गेल्या काही काळापासून शनाया चित्रपटांमध्ये काम करेल असे बोलले जात आहे.

भविष्यात अभिनेत्री म्हणुन काम करणार असणारी संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आता मीडियाच्या ठळक बातम्यांमध्ये दिसत आहे. तिने स्वत:च्या इन्स्टाग्रामवरून तिचे बरेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शनाया अतिशय सुंदर दिसत आहे. यात ती बेडवर बसुन पोज देताना दिसत आहे. नुकतेच शनाया कपूरने आपले इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केले आहे. शनायाने इन्स्टाग्राम अकाऊंट सार्वजनिक केल्यानंतर (प्रायव्हसी काढून टाकली) ती बर्‍याचदा चर्चेचा विषय बनत आहे.

शनिवारी सकाळी शनायाने तिच्या इंस्टाग्रामवर बेडवरचे जबरदस्त व आकर्षक असे फोटो शेअर केले. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शनाया कपूरने फोटो शेअर करत लिहले की, ‘तुमच्या शनिवारची सकाळ कॉफी सारखी गरम असावी आणि शनिवारची रात्र अगदी थंड असावी.’ फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा नाईट सूट घातला आहे. याशिवाय तिने सिल्व्हर कलरचे डोळ्याचे मास्कदेखील लावले आहे. फोटोत तिचा मेकअप खूपच कमी असुन तिचे केस खुले दिसत आहेत.

या फोटोवर वडील संजय कपूर यांनी कमेंट केली की, ‘आज तू तुझ्या वडिलांसोबत डिनर कर’. अलीकडेच शनाया कपूर तिच्या खास मैत्रिणी सुहाना खान, नव्या नवेली नंदा आणि अनन्या पांडेसोबत पार्टी करताना दिसली होती. सोशल मीडियावर तिचे बरेचसे सुंदर फोटोही व्हायरल झाले होते. जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन तिने काम केले आहे. आता ती लवकरच चित्रपटांमध्ये दिसू शकते. काही काळानंतर शनाया चित्रपटांमध्ये काम करेल अशी चर्चा आहे.

शनाया कपूर सुहाना खानची खूप चांगली मैत्रीण आहे. सुहाना खानही लवकरच चित्रपटांमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच ती एअरपोर्टवर दिसली होती. सुहाना खान सध्या अमेरिकेत फिल्म मेकिंगचा अभ्यास करत आहे.

हे देखील वाचा