Friday, July 5, 2024

केबीसीचा शानदार शुक्रवार होणार ‘शोले’मय, हेमा मालिनी आणि रमेश सिप्पी देणार सिनेमाच्या आठवणींना उजाळा

केबीसीमध्ये प्रत्येक आठवड्याचा शुक्रवार हा शानदार शुक्रवार म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळे पाहुणे शोमध्ये येतात आणि हा खेळ खेळत अमिताभ बच्चन यांच्यासोबत धमाल करतात. या आठवड्यात केबीसीमध्ये बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी हे या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडचा सुपरहिट आणि आयकॉनिक अशा ‘शोले’ सिनेमाला ४६ वर्ष झाले. हे ४६ वर्ष साजरे करण्यासाठी या शोमध्ये येत आहे. केबीसीचा सेट ह्यावेळेस ‘शोले’मय झाला होता. या भागाचे प्रोमो टीव्हीवर आणि सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे.

केबीसीच्या निमित्ताने अमिताभ बच्चन, रमेश सिप्पी आणि हेमा मालिनी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत या सिनेमातील अजरामर संवाद देखील म्हणताना दिसणार आहे. याचे प्रोमो सध्या तुफान गाजत आहे. यासोबतच चित्रपटाबद्दलचे अनेक माहित नसलेले किस्से, काही गोष्टी देखील सर्वांसोबत शेअर करताना दिसणार आहे. या शोमध्ये जिंकलेली सर्व रक्कम ते सामाजिक कार्यासाठी वापरताना दिसणार आहे.

यासोबतच कौन बनेगा करोडपतीच्या प्रोमोमध्ये धर्मेंद्र यांचा “बसंती इन कुत्तोके सामने मत नाचना” हा हेमा मालिनी म्हणताना दिसत आहे. त्यांच्या आवाजातून हा संवाद खूपच गोड आणि हटके वाटल्याने यानंतर शोमध्ये एकच हशा पिकला. या भागाचे विविध प्रोमो पहिले तर लक्षात येईल की, अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी हे दोघे सिनेमातील कलाकारांचे त्यांच्या स्टाईलमध्ये संवाद म्हणताना दिसत आहे.

तब्बल ४६ वर्षांपूर्वी आलेल्या शोले सिनेमाने बॉलीवूडला एक वेगळे आणि सुखद वळण दिले. सुडाची कथा असणारा हा शोले सिनेमा आज एवढ्या वर्षांनंतरही प्रत्येक माणसाच्या मनावर ठासून कोरला गेला आहे. सुरुवातील फ्लॉप ठरलेला हा सिनेमा नंतर मात्र ऑल टाईम हिट या विभागात वरच्या स्थानावर पोहचला आहे. या सिनेमाने आणि यातील कलाकारांनी प्रेक्षकांवर घातलेली मोहिनी आजही कायम आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा