Tuesday, February 18, 2025
Home अन्य शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘हे गणराया’ गाणे लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘हे गणराया’ गाणे लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गणपतीची गाणी आणि प्रसिद्ध गायक शंकर महादेवन (Shankar mahadevan) हे एक अनोखं समीकरण बनलं आहे. आता या समीकरणाची आणखी एक सुंदर कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या समोर आली आहे. संगीतकार नीरज करंदीकर यांच्या सुमधुर संगीताने बाप्पाचं आणखी एक गाणं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायला आलं आहे. तसेच डॉ. संगीता बर्वे यांच्या शब्दांनी गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यामुळे या वर्षीच्या गणेशोत्सवात ‘हे गणराया जीवा लागला तुझ्या कृपेचा ध्यास ’ हे गाणं सगळीकडे ऐकू येणार हे नक्की…
गणेशस्तुती हा रसिकांच्या पसंतीचा विषय आहे. शब्द, संगीत आणि गायन ह्याचा त्रिवेणी संगम या गाण्यात आपल्याला दिसून येईल . कलेची देवता असलेल्या अधिपती गणपती बाप्पाला या गाण्याच्या माध्यमातून आपली सेवा या सर्व कलाकारांनी पोहोचवली आहे. श्रवणीय संगीत, शब्द मधुर गीत आणि शंकरजींच्या आवाजातला गोडवा नक्कीच बाप्पा पर्यंत पोहोचणार आणि बाप्पाच्या आशीर्वादाने अशाच उत्तमोत्तम कलाकृती घडत जाणार.
संगीतकार नीरज करंदीकर यांनी यापूर्वीही दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. आशा भोसले, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते, देवकी पंडित, बेला शेंडे, आर्या आंबेकर (Arya ambekar) यांच्यासाठी नीरज यांनी यापूर्वी संगीत दिलेले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने नीरज यांनी गायिका प्रियांका बर्वे यांनी गायलेल्या गाण्याला संगीतबद्ध केले होते.
हेही वाचा-

हे देखील वाचा