बॉलिवूडमध्ये अनेक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अशातच रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या आगामी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यांचा ‘शमशेरा’ हा चित्रपट येत्या २२ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची मागील अनेक दिवसापासून चर्चा चालली होती. प्रेक्षकांना देखील या चित्रपटात काय असणार आहे याची उत्सुकता लागली होती. यशराज फिल्मने ट्विट करून या गोष्टीची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “२२ जुलै रोजी चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात ‘शमशेरा’ जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट प्रदर्शित होण्याची बातमी देण्यासोबतच चित्रपटाचा टिझर देखील समोर आला आहे.१ मिनिटाच्या टिझरमध्ये काही माणसे दिसत आहेत. ते हिंदीत म्हणतात की, “ही कहाणी त्याची आहे. ज्याने म्हटले होते की, गुलामी करणे चांगले नाही. ना लोकांची ना जवळच्या माणसांची.” वाणी कपूर म्हणते की, “ही काहणी त्यांची आहे ज्यांनी आपल्या वडिलांच्या राज्यात स्वतंत्र होण्याचे स्वप्न पाहिले आहे.” (Shanshera teaser Ranbir Kapoor, Vani Kapoor, Sanjay Dutt movie release on 22 July 2022)
करण मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट एक पिरियड ऍक्शन ड्रामा चित्रपट रुपात दाखवला गेला आहे. यात रणबीर कपूर बाप आणि मुलाच्या दोन्ही भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आशुतोष राणा, सौरभ शुक्ला आणि रोनित रॉय हे कलाकार देखील दिसणार आहेत.
हेही वाचा :