Friday, July 5, 2024

‘बायको असावी तर अशी’, म्हणत अभिनेता शरद केळकरने पत्नी कीर्तिला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चित्रपटसृष्टीत आणि टेलिव्हिजनवर अनेक कलाकार असे आहेत, जे एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले. एवढंच नाही तर अगदी लग्न करून त्यांच्या प्रेमाला पूर्णत्व देखील दिले आहे. असे टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमधून घराघरात पोहचलेलं लोकप्रिय जोडपं म्हणजे शरद केळकर आणि कीर्ति केळकर. आज शरद आणि कीर्ति त्यांच्या लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा करत आहेत, तर जाणून घेऊया त्यांची प्रेम कहाणी.

शरद केळकर आणि कीर्ति केळकर यांनी 3 जून, 2005 मध्ये लग्न केले होते. आज त्यांच्या या सुखी संसाराला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शरद केळकर याने त्याच्या पत्नी सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो आणि कीर्ति बेडवर झोपलेले दिसत आहेत. यामध्ये कीर्ति ‘तुम से मिलके’ हे गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून शरदने कॅप्शन दिले आहे की, “बायको असावी तर अशी, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेबी.” त्यांच्या या व्हिडिओला त्यांचे चाहते प्रतिक्रिया देऊन त्यांच्यावर शुभेछाचा वर्षाव करत आहेत.

याव्यतिरिक्त त्याने फोटोही शेअर केला आहे. त्यामध्ये ते वधू- वराच्या वेशात दिसत आहेत.

शरद आणि कीर्तिने अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी टेलिव्हिजन वरील ‘सिंदूर तेरे नाम का’, ‘साथ फेरे: सलोनी का सफर’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘सिंदूर तेरे नाम का’ या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तिथूनच त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. त्यांनी ‘नच बलिये’ मध्ये देखील सहभाग घेतला होता.

शरदने आता टेलिव्हिजनवरून बॉलिवूडमध्ये वाटचाल केली आहे. तो सुपरहिट चित्रपट देताना दिसत आहे. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ‘तानाजी’, ‘लक्ष्मी’, ‘एजंट राघव’, ‘भूमी’, ‘लय भारी’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच कीर्तिने देखील ‘कमाल’, ‘सिंदूर तेरे नाम का’, ‘ससुराल सिमर का’, ‘छोटी बहू’, ‘सिद्धांत’, ‘एक शृंगार स्वाभिमान’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा