आज देशात मोठ्या जल्लोषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी सगळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वच आजच्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत. आजच्या दिवशी त्यांच्या विचारांची देवाण घेवाण होत आहे. यातच आता दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत बाबासाहेब आंबेडकर यांचा एक सुंदर विचार शेअर केला आहे.
शरद पोंक्षे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “राज्यघटना ही पोशाखाप्रमाणे अंगास चांगली चपखल बसली पाहिजे. अध्यक्ष महाराज मी प्रतिज्ञा पूर्वक सांगतो की, जेव्हा जेव्हा माझे वैयक्तिक हित की सर्व देशाचे हित यात संघर्ष निर्माण झाला, तेव्हा तेव्हा मी देशाच्या हिताला प्राधान्य दिले, स्वतःच्या हिताला दुय्यम मानले ,स्वहित बुद्धीने मी आयुष्यात मार्ग चोखाळलेला नाही. जर मी आपल्या शक्तीचा आणि परिस्थितीचा स्वतःसाठी उपयोग केला असता, तर आज मी दुसऱ्याच एखाद्या स्थानी असतो. देशाच्या मागण्यांचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा तेव्हा मी इतरांच्या पाठीमागे आहे तसुभरही नव्हतो, परंतु या देशातील जनतेच्या मनात मी नसती शंका राहू देणार नाही.
View this post on Instagram
मी दुसऱ्या एका अशा काही निष्ठेला बांधला गेलो आहे, की तिला मी कधीही अंतर देऊ शकणार नाही. ती निष्ठा म्हणजे माझा अस्पृश्यवर्ग .त्यांच्यात मी जन्मास आलो .त्यांचा मी आहे. जीवात जीव असेपर्यंत मी त्यांना अंतर देणार नाही .यास्तव या विधिमंडळाला मी दृढनिष्ठेपूर्वक सांगतो की, जेव्हा अस्पृश्यांचे हित व देशाचे हित यामध्ये संघर्ष निर्माण होईल, त्यावेळी माझ्यापुरते मी सांगतो की मी अस्पृश्यांच्या हितालाच प्राधान्य देईन. देशाचे हित आधी की, माझे हित आधी असा प्रश्न उद्भवला तर मी आधी देशाचेच हित पाहीन. तसेच माझ्या समाजाचे हित आधी की देशाचे हित आधी असा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा मी अस्पृश्य वर्गाच्या हिताच्याच बाजूने उभा राहील. डॉ बाबासाहेब आंबेडकर. ह्या महामानवास विनम्र अभिवादन.”
शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचे विचार व्यक्त केले आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट यांचा अविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे दुःखद निधन