द केरळ स्टोरी हा चित्रपट जेवढा गाजला तेवढाच विवादित सुद्धा होता, आणि याचा आता पार्ट 2 येणार आहे. पण याचा टिजर प्रदर्शित झाला आहे, यावर आता भारतीय राजकारण आणि चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. ‘द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्याच्या निर्मात्यांवर जोरदार हल्ला चढवला. थरूर यांनी आरोप केला की, पहिल्या चित्रपटाप्रमाणेच हा सिक्वेलही कोणत्याही ठोस तथ्यांशिवाय द्वेष पसरवणाऱ्या आणि फुगीर कथांना प्रोत्साहन देत आहे.
शशी थरूर (Shashi Tharoor)यांच्या मते, चित्रपटात सादर केलेली कथा अतिशयोक्तीपूर्ण आहे. हजारो लोकांनी धर्मांतर केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. वास्तव असे आहे की गेल्या काही वर्षांत अशा केवळ 30 घटना नोंदवल्या गेल्या आहेत.” भारत हा एक खूप मोठा देश आहे. वेगळ्या घटनांचा प्रचार म्हणून वापर करून त्यांना मोठ्या, अधिक भयानक कथेत रूपांतरित करणे चुकीचे आहे. शशी थरूर यांनी सिनेमाच्या बदलत्या स्वरूपाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. अमर अकबर अँथनी” या चित्रपटाचे देत ते म्हणाले, या चित्रपटात सांप्रदायिक सौहार्द दिसून आले.
“द केरळ स्टोरी 2 – गोज बियॉन्ड” हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमधील धार्मिक धर्मांतर आणि कट्टरतावादाच्या कथा दाखवल्या आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांचा दावा आहे की, हा चित्रपट लक्ष्यित कट्टरतावादाचे कठोर सत्य उघड करतो. त्यांच्या प्रचारात्मक साहित्यात, निर्मात्यांनी कठोर शब्द वापरले, “त्यांनी आमच्या मुलींना लक्ष्य केले आणि त्यांचा विश्वास तोडला. यावेळी आम्ही गप्प राहणार नाही; कथा आणखी पुढे जाईल. यावेळी आम्ही ते सहन करणार नाही…आम्ही लढू.”
या चित्रपटाचा सिक्वेल आता कायदेशीर तपासणीखाली आहे. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या भागाला 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि छायांकन पुरस्कार मिळाले, चित्रपटाच्या ट्रेलर आणि त्यात केरळचे चित्रण करण्याला आव्हान देणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याची दखल घेत न्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालय, सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीही या प्रकल्पाचा तीव्र निषेध केला आहे. ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी बनवलेल्या बनावट कथांना कशी मोकळीक दिली जात आहे हे धक्कादायक आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
शाहरुख खानची पहिली हीरोइन, मिर्झापूरमुळे नवी ओळख, तर आणि आता पूर्णपणे बदलाय लुक


