Wednesday, October 15, 2025
Home टेलिव्हिजन ‘अली बाबा’पासून वेगळे झाल्यानंतर शिजान खानने शेअर केली सूचक पोस्ट म्हणाला, “मी…

‘अली बाबा’पासून वेगळे झाल्यानंतर शिजान खानने शेअर केली सूचक पोस्ट म्हणाला, “मी…

टिव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या करुन तिचे जीवन संपवले. तिने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा बाॅयफ्रेड शिजान खानला पोलिस कोठडी सुनवण्यात आली होती. त्या प्रकरणानंतर शिजान बराच चर्चेत राहिला. सध्या शिजान रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित असलेला शो ‘खतरों के खिलाडी 13’साठी शुटिंग करत आहे.

अभिनेता शिजान खानला (Sheeza Khan) नुकतेच त्याचे व्यावसायिक आयुष्य पाहता परदेशात जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मात्र, त्यानंतरही शिजानचा त्रास काही संपत नाहीये. शिजान हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय स्टंट शो ‘खतरों के खिलाडी’ सीझन 13चा (Khatron Ke Khiladi 13) एक भाग आहे. त्याने आतापर्यंत शोमधील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये शिजान बाकी स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसतो.

sheezan khan

अलिकडेच अभिनेता शिजान ‘अली बाबा’च्या वेशभूषेत दिसला होता, त्यानंतर लोक विविध अंदाज लावत आहेत. तो सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. तो त्याच्या सहकारी स्पर्धकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. आता त्याने अलीबाबाच्या वेशभूषेतील त्याचा एक फोटो शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करताना शिजानने लिहीले की, ‘मैं अली था मैं अली हूं.’ त्याच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु झाली आहे, याच दरम्यान त्याने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्याने काही गोष्टीचा संदर्भ दिला आहे.

शिजान म्हणाला की, “मी कुठेही गेलो तरी आजही लोक मला विचारतात की तू अली बाबा शो का सोडलास? यावर मी उत्तर देतो की मी सोडले नाही, फक्त एक बंधन तोडून दुसर्‍यावर आलो आहे. तसेच स्वत:ला एका जागी बंदिस्त न ठेवणे हा कलाकाराचा गुण आहे असे मला वाटते. पुढे जात राहिल पाहिजे, यालाच कला म्हणतात.”

हे देखील वाचा