Friday, August 1, 2025
Home टेलिव्हिजन बऱ्याच काळानंतर अभिनेता शिजान खानच्या घरी आला आनंद, ‘या’ कारणामुळे आहे संपूर्ण कुटुंब खुश

बऱ्याच काळानंतर अभिनेता शिजान खानच्या घरी आला आनंद, ‘या’ कारणामुळे आहे संपूर्ण कुटुंब खुश

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेता शिजान खान खूपच चर्चेत आला आणि त्याला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. तिला आत्महत्येला प्रेरित केल्याच्या आरोपाखाली त्याला काही दिवस जेलमध्ये देखील राहावे लागले होते. मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्याला सोशल मीडियावर काहींनी खूप ट्रोल केले तर काहींनी त्याला पाठिंबा दिला. बराच काळ अतिशय चिंतेत आणि कठीण काढल्यानंतर आता खान कुटुंबासाठी आनंदाचे दिवस आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shafaqq Naaz (@shafaqnaaz777)

लवकरच शिजानची बहीण आणि अभिनेत्री शफक नाज साखरपुडा करणार आहे. त्यांच्या कुटुंबाच्या एका जवळील व्यक्तीने या साखरपुड्याबद्दल माहिती दिली आहे. एका मोठ्या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार शफक नाज याच महिन्यात शेवटी साखरपुडा करणार आहे. यासोबतच ती ज्या व्यक्तीसोबत साखरपुडा करणार आहे, तो या क्षेत्रातील नाही. मात्र अजून पर्यंत या साखरपुड्याची तारीख आणि ठिकाण समोर आले नसले तरी त्यांचे कुटुंब मीडियापासून या गोष्टी लपवून ठेवण्याची काळजी घेत आहे. कारण आता त्यांना या कारणामुळे पुन्हा लाइमलाईट्मधे नाही यायचे. यासोबतच अशी देखील माहिती समजली की, शफक नाज जवळपास अडीच वर्षांपासून त्या व्यक्तीला डेट करत आहे. ती व्यक्ती ओमान येथील एक प्रतिष्ठित उद्योजक आहे.

जेव्हा याबद्द्ल जाणून घेण्यासाठी शफक खानशी संपर्क केले गेला तेव्हा तिने यावर बोलण्यास नकार देत, “आम्ही अजून यावर काहीही निर्णय घेतला नसल्याने मला यावर आता काहीच बोलायचे नाही.” दरम्यान शफक नाज हा टेलिव्हिजनविश्वातील नावाजलेला चेहरा आहे. तिने अनेक मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम केले. तिने महाभारत, चिडिया घर, कुल्फीकुमार बाजेवाला, लाल इश्क, सावधान इंडिया, गुम हैं किसी के प्यार मैं आदी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

हे देखील वाचा