Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड भावपूर्ण श्रद्धांजली! अवघ्या 42 व्या वर्षी काटा लगा गर्ल शेफाली जरीवालाचे निधन

भावपूर्ण श्रद्धांजली! अवघ्या 42 व्या वर्षी काटा लगा गर्ल शेफाली जरीवालाचे निधन

‘बिग बॉस’ (Big Boss)मध्ये दिसलेली अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) 27 जूनच्या रात्री निधन झालं, आणि त्यामुळे सगळं एंटरटेनमेंट इंडस्ट्री सुन्न झालं आहे. आता अनेक सेलिब्रिटी तिच्या जाण्यानं दुख: व्यक्त करत आहेत.

‘कांटा लगा’ गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं अचानक निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री (27 जून) शेफालीला छातीत दुखू लागलं आणि काही वेळातच तिला रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. कार्डियाक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शेफालीच्या जाण्याने सगळं एंटरटेनमेंट इंडस्ट्री हळहळून गेलंय. गायक मीका सिंग, राहुल वैद्य, अली गोनी यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी तिला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. अनेक चाहत्यांनीसुद्धा ‘कांटा लगा गर्ल’ला शेवटचा निरोप दिला आहे.

2002 मध्ये आलेल्या ‘कांटा लगा’ गाण्यामुळे शेफाली प्रचंड फेमस झाली होती. त्यानंतर ती ‘बिग बॉस 13’ आणि ‘नच बलिए’ मध्येही दिसली होती. अभिनयाबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं. पाराग त्यागीशी तिचं दुसरं लग्न 2014 मध्ये झालं.

तिचा अचानक जाणं हे सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. शेफालीचं हसतं-खेळतं व्यक्तिमत्त्व, तिचा ग्लॅमरस अंदाज आणि प्रामाणिकपणामुळे ती कायम आठवणीत राहील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

घरासमाेर घडली भीषण घटना !

हे देखील वाचा