Monday, July 1, 2024

बॉलिवूडमधील ‘काटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाने केले बिकिनीमधील फोटो शेअर, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे सामान्य माणसांपासून ते अनेक कलाकारांपर्यंत अनेकजण त्यांच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतो. बॉलिवूड कलाकार तर यात सर्वात टॉपला आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने सगळे कलाकार घरीच आहेत. त्यामुळे अनेक कलाकार त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामध्ये समावेश होतो बॉलिवूडमधील ‘कटा लगा गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला हिचा. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करून चाहत्यांशी जोडून ठेवते. अशातच तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेफालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती एका स्विमिंग पूलमध्ये आहे. तिने लाल रंगाची बिकिनी घातली आहे. स्विमिंग पूलमधील फोटो तिने शेअर केले आहेत.

या फोटोत तिच्यासोबत तिचा कुत्रा देखील दिसत आहे. या फोटोमध्ये विना मेकअप देखील तिचे सौंदर्य खूप खुलले आहे. तिच्या या फोटोला नेहमी प्रमाणेच तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. तसेच या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘तू तर माझा श्वासच काढून घेतलास.’

शेफाली जरीवाला हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2002 रोजी ‘काटा लगा’‌ या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते. या एकाच गाण्याने तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिला सगळेजण काटा लगा या नावाने ओळखू लागले. तिने अनेक रियॅलिटी शो आणि अनेक कन्नड चित्रपटात देखील काम केले आहे. यानंतर ती ‘नच बलिये’ या शोमध्ये तिच्या बॉयफ्रेंड सोबत दिसली होती. तिने ‘बेबी कम ना’ या वेब सीरिजमध्ये श्रेयस तळपदे सोबत काम केले आहे. तसेच ती ‘बिग बॉस 13’ ची स्पर्धक देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या जबरदस्त व्हिडिओवरून हटेना चाहत्यांची नजर; पाहा तिची मोहक अदा

-‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, ‘खड तैनू मैं दस्सा’ गाण्यावरील नेहा कक्करचे एक्सप्रेशन्स पाहून युजरची कमेंट

-तूफानों से’ गाणं म्हणत कैलाश खेर, शिबानी कश्यप अन् सुदेश भोसले यांनी केला कोरोना योद्धांना सलाम

-‘मास्क लावायचे ज्ञान देत होती, आता..’, हर्षाली मल्होत्राचे बीचवरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा