Monday, July 1, 2024

शनहाझ गिलला वधूच्या अवतारात पाहून नेटकऱ्यांची आगपाखड, सिद्धार्थच्या मैत्रीवर प्रश्न केले उपस्थित

पंजाबची ‘कॅटरिना कैफ’ आणि ‘बिग बॉस १३’ फेम शहनाझ गिल हळूहळू सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. अचानक तिचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाल्याने शहनाझला धक्का बसला होता. मात्र, काही काळ ब्रेक घेतल्यानंतर शहनाझ पुन्हा सर्व कामावर रुजू झाली आहे. त्याचबरोबर शहनाझला चाहत्यांचाही जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. अलीकडेच, शहनाझचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती एका नववधूच्या अवतारात दिसत आहे. मात्र, तिच्या या लूकवर चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

शहनाझ गिलच्या नवरी बनण्यावर चाहत्यांनी केले प्रश्न उपस्थित
या व्हिडिओमध्ये शहनाझ खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनीही तिची जोरदार प्रशंसा केली. मात्र, सोशल मीडियावर असे काही युजर्स आहेत, ज्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिचा वधूचा अवतार पाहून अनेक युजर्स भडकले आणि त्यांनी शहनाझला टार्गेट करायला सुरुवात केली.

युजर्सचे म्हणणे आहे की, सिद्धार्थच्या मृत्यूला फारच कमी वेळ झाला आहे आणि शहनाझ अशाप्रकारे आनंदी कशी असेल. अनेक युजर्सनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, शहनाझ सिद्धार्थवर प्रेमाची उधळण करायची. मग तिच्या मृत्यूनंतर काही काळानंतर ती अशी नववधू म्हणून कशी दिसू शकते.

सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले होते. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने अचानक हे जग सोडले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या बातमीचा शहनाझवर खूप वाईट परिणाम झाला. तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती एकदम वेडी दिसत होती.

शहनाझच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांनी सांगितले की, सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारानंतर शहनाझ नीट जेवत नाही आणि झोपतही नाही. जरी ती आता हळूहळू तिच्या कामावर परतली आहे आणि तिची व्यावसायिक बांधिलकी पूर्ण करत आहे, परंतु युजर्स तिला विनाकारण ट्रोल करत आहेत.

शहनाझचा हा व्हायरल व्हिडिओही खूप जुना आहे. अलीकडेच शहनाझ तिच्या ‘हौंसला रख’ या कॉमेडी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दिसली होती. या चित्रपटात नायक दिलजीत दोसांझ आहे. यासोबतच काही काळापूर्वी सिद्धार्थ आणि शहनाझचा ‘हॅबिट’ गाण्याचा व्हिडिओही प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सिद्धार्थला शेवटच्या वेळी पाहून चाहते खूप भावूक झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो

-‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’ करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण

-शाहिद कपूर आणि अमृता रावच्या सुपरहिट ‘इश्क विश्क’ चित्रपटाचा येणार सिक्वल

हे देखील वाचा