Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड प्रीती झिंटाच्या ‘बुमरो बुमरो’ गाण्यावर काश्मिरमध्येच थिरकली शहनाज गिल, व्हिडीओने सोशल मीडियावर मिळविल्या लाखो हिट्स

प्रीती झिंटाच्या ‘बुमरो बुमरो’ गाण्यावर काश्मिरमध्येच थिरकली शहनाज गिल, व्हिडीओने सोशल मीडियावर मिळविल्या लाखो हिट्स

बिग बॉस 13 मध्ये लोकप्रिय झालेली अभिनेत्री ‘शहनाज गिल’ ही तिच्या स्टाईल आणि अदाकारीमुळे प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. शहनाज गिल हिला सर्वत्र पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखतात. ती सध्या एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. त्यासाठी ती भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरला गेली आहे. शहनाजने तिचे काश्मीरचे अनेक फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र यातील तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ खूपच वायरल होत आहे.

शहनाज ही रॅपर बादशाह याच्यासोबत गाण्याच्या शूटिंगसाठी कश्मिरला गेली आहे. शहनाजने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बादशाह आणि तिचा एक व्हिडिओ शेअर करत ही बातमी प्रेक्षकांना दिली आहे. तसेच तिने एक डान्स व्हिडिओ देखील शेअर केला आहे .

या व्हिडीओमध्ये शहनाज काश्मीरी लूकमध्ये दिसत आहे. ऋतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांच्या ‘बुमरो बुमरो’ या गाण्यावर तिने डान्स केला आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक आणि तिची स्टाईल खूपच आवडली आहे.

या व्हिडीओमध्ये शहनाजने ‘प्रीति झिंटा ‘सारखा मेकअप केला आहे.’ मिशन काश्मीर ‘ या चित्रपटातील ‘बुमरो’ या गाण्यावर ती डान्स करताना दिसते. या काश्मीरी लूकमध्ये शहनाज खूपच सुंदर दिसत आहे. तीने ट्रेडिशनल काश्मीरी लूक केला आहे. यामध्ये तिने सलवार कुर्ता सोबतच फेरान देखील घातले आहे. आणि डोक्यावर पारंपरिक काश्मीरी टोपी घातली आहे.

शहनाजच्या या व्हिडिओला आता पर्यंत 15 लाखापेक्षा ही जास्त व्हूव्ज मिळाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत तिचे किती तरी फॅन्स तिला ‘काश्मीर की कली’ म्हणत आहेत.

हेही वाचा-
व्हिडीओ शेअर करत अंकिताने इंटरनेटवर वाढवली  धकधक, तरीही चाहत्यांनी घेतले फैलावर
ढोलकीच्या तालावर थिरकले पद्मिनी कोल्हापुरे आणि मुलगा प्रियांकचे पाय; पाहा जबरदस्त डान्स
मैं तेरा बॉयफ्रेंड  गाण्यावर जेनेलियाने मुलांसोबत केली मजामस्ती; व्हिडिओला मिळाले ५ लाखांपेक्षा अधिक लाईक्स

हे देखील वाचा