Tuesday, July 9, 2024

सिद्धार्थला पूर्णतः विसरलीये शहनाझ गील; होळीच्या रंगात रंगली आणि अशी काय नाचली, तुम्हीच पाहा हा व्हिडिओ

नुकताच होळीचा सण सर्वानी दणक्यात साजरा केला. मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि रंगानी भरलेल्या या सणाची अजूनही जादू ओसरलेले नाही. रंगांचा सण अशी ओळख असलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवनवीन रंग भरण्याचे काम करतो. मनोरंजनविश्वात देखील मोठ्या जल्लोषात होळी साजरी झाली. कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या होळी सेलिब्रेशनचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. सध्या हे फोटो तुफान गाजत आहे.

या सोशल मीडियावरील कलाकारांच्या होळीच्या फोटोंपैकी एका अभिनेत्रींच्या फोटोनी चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. आणि ती अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. पंजाबची कॅटरिना कैफ अशी ओळख असणाऱ्या शहनाजने देखील मोठ्या दणक्यात होळी साजरी केली आहे. तिने तिच्या या होळीचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले असून, सध्या तिच्या या फोटोंची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाज गिलने शेअर केलेल्या तिच्या फोटोंमध्ये तर तिला ओळखणे देखील कठीण होऊन बसले आहे. काळ्या रंगाचा एकदम सैल टीशर्ट त्यावर क्रीम रंगाची पँट शहनाजने होळीसाठी घातली होती. यासोबतच तिने एक मास्क देखील घातलेले दिसले. तिने शेअर केलेले फोटो पाहून ती रंगात अक्षरशः न्हाऊन निघायचे दिसत आहे. तिने या होळीचा जबरदस्त आनंद लुटला आहे हे नक्की. या रांगांमध्ये देखील ती खूपच क्युट आणि निरागसता दिसत आहे. या फोटोंसोबत तिने तिचा एक मजेशीर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात तिने तिचा हात टीशर्टमधे लपवला असून, टीशर्टच्या बाह्या लटकताना दिसत आहे.

शहनाजने तिच्या होळीचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “रंगाने भरलेली होळी, आनंदाची होळी, माझी तुमची सर्वांची होळी, हॅप्पीवाली होळी!!!” तिच्या या पोस्टवर तिच्या फॅन्सने आनंद दाखवला असून सिद्धार्थनंतर आता तिने आनंद साजरा करायला सुरुवात केल्याने ते खुश असल्याचे कमेंट्स मध्ये सांगितले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Womens Day Special: आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी

हे देखील वाचा