सध्या सोशल मीडियाची वाढणारी क्रेझ आणि पोहच पाहून आजची पिढी तर या माध्यमाच्या अधीन झाली आहे. प्रत्येक गोष्ट, छोट्या छोट्या अपडेट सोशल मीडियावर देणे जणू काही अलिखित नियमच बनला आहे. कलाकार देखील त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या अपडेट त्यांच्या फॅन्सला देताना दिसतात. कोणताही नवीन मोठा सिनेमा प्रदर्शित झाला की, त्याच्या चर्चा सोशल मीडियावर लगेचच होताना दिसतात. कलाकार देखील नवीन सिनेमा पहिला की, त्याची स्तुती सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसतात. मात्र कधी कधी आपण उत्साहाच्या भरात अधिक बोलत आहोत याचे भानच त्यांना राहत नाही. असेच काहीसे घडले आहे अभिनेत्री शेहनाज गिलच्या बाबतीत.
नुकताच अभिनेता यशचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा ‘केजीएफ २’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच बॉक्स ऑफिसवर कमाईचा सपाटा लावला आहे. अवघ्या काही दिवसातच या सिनेमाने रेकॉर्ड तयार करायला सुरुवात केली आहे. या सिनेमाने तर सोशल मीडियावरही चांगलाच बज निर्माण केला असून, या माध्यमातही सतत सिनेमाच्याच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे कौतुक करताना कलाकार देखील मागे नसून, नुकतीच अभिनेत्री शेहनाज गिलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाचे कौतुक केले आहे. तिने हा सिनेमा पहिला आणि सिनेमाचे कौतुक करण्यापासून ती स्वतःला थांबवू शकली नाही. मात्र हे कौतुक करत असताना तिने एक मोठी चूक केली जी अभिनेता यश आणि अभिनेत्री श्रीनिधीने तिच्या लक्षात आणून दिली आहे.
शेहनाज गिलने तिच्या ट्विटमध्ये शेहनाजने लिहिले आहे की, “अभिनंदन…तुम्हा सर्वांना खूपच प्रेम. व्हॉयलेन्स (हिंसा) खूपच आवडली. यश, श्रीनिधी, संजय दत्त, रवीना टंडन आणि प्रशांत निल यांचे काम खूप आवडले. केजीएफ २ ला सलाम.” शेहनाजच्या ट्विटवर यश आणि श्रीनिधी यांनी कमेंट करत तिला धन्यवाद म्हटले आहे. या कमेंटवर शेहनाजने रिप्लाय करताना लिहिले, “अरे अजिबात धन्यवाद म्हणू नका. त्याची गरज नाही. एवढे तर मी म्हणूनच शकते. शेवटी तुम्ही रॉकी भाईसाठी गोळी खाल्ली आहे. तुमचे काम खूपच आवडले.”
शेहनाजच्या ट्विटवर प्रियांका भट्ट नावाच्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “एवढे पण नव्हते सांगायचे”, ज्यावर पुन्हा शेहनाजने रिप्लाय करताना लिहिले, “हा चित्रपटाचा हँगओव्हर आहे. आता काहीच नाही बोलणार, माफ करा मी एवढा विचार नाही केला. मनातली गोष्ट तोंडावर आली. कंट्रोल शेहनाज कंट्रोल.” यावर श्रीनिधीने कमेंट करत लिहिले, “आम्हाला खूपच आनंद झाला की, तुम्हाला आमचा सिनेमा एवढा आवडला.” केजीएफ २ हा सिनेमा १४ एप्रिलला प्रदर्शित झाला असून, त्याने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाईचे रेकॉर्ड बनवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-