‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाने अचानक जगाला निरोप दिला, जे चाहते अजून विसरू शकले नाहीत. मात्र आता शेवटच्या वेळी त्याचे चाहते त्याला पडद्यावर पाहू शकतील. शहनाझ गिलसोबत ‘अधूरा’ या त्याच्या शेवटच्या गाण्याचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीझ करण्यात आलं आहे. सिडनाझचा हा शेवटचा म्युझिक व्हिडिओ २१ ऑक्टोबरला रिलीझ होणार आहे. ‘अधुरा’चं पोस्टर पाहून चाहते भावूक होत आहेत. त्याचबरोबर या गाण्याला आपला आवाज देणाऱ्या गायिका श्रेया घोषालने सिद्धार्थला स्टार म्हटलं आहे.
‘अधूरा’ या गाण्याला श्रेया घोषाल आणि अर्को प्रवो मुखर्जी यांनी गायलं आहे. सिद्धार्थ शुक्लाने मृत्यूपूर्वीच शहनाझ गिलसोबत या म्युझिक व्हिडिओसाठी काम केलं होतं. हे गाणं सिडनाझच्या चाहत्यांसाठी खूप खास ठरणार आहे. गायिका श्रेया घोषालने ‘अधुरा’ गाण्याचं पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “तो एक स्टार होता आणि नेहमीच राहील…लाखो हृदयांचे प्रेम सदैव चमकत राहील.” (shehnaaz gill sidharth shukla last song adhura first poster out song release on)
तिने पुढं लिहिलं, “अपूर्ण आहे, तरीही ते पूर्ण होणार. सिडनाझचे हे शेवटचे गाणे, प्रत्येक चाहत्याची इच्छा, आमच्या हृदयात कायम जिवंत राहील.” ‘अधूरा’च्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये टॅग लाइन लिहिली आहे, ‘एक अधूरा गाना, एक अधूरी कहानी, एक सिडनाझ का गाना.’
सोशल मीडियावर हे पोस्टर पाहून चाहतेही भावूक होत आहेत. एका युजरने लिहिले, “याने मला खूप भावुक केलं आहे. हे गाणं पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही.” दुसऱ्याने लिहिलं की, “सिद्धार्थ नेहमी हृदयात राहील. ‘अधुरा’ हिट होईल.” त्याचवेळी काही चाहते गाण्याच्या शीर्षकाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. सिडनाझच्या एका चाहत्याने लिहिले की, “आम्हाला गाण्याचे शीर्षक #habit हवे आहे. कृपया आमच्या भावनांशी खेळू नका.”
ज्या म्युझिक व्हिडिओवर सिद्धार्थ शुक्ला मृत्यूपूर्वी शहनाझ गिलसोबत काम करत होता, त्याचे शीर्षक ‘हॅबिट’ होते. मात्र, त्याच्या निधनाने सर्व काही बदललं. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी शीर्षक बदलून ‘अधूरा’ ठेवलं आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सिडनाझ’च्या शेवटच्या गाण्याचे नाव बदलल्यामुळे भडकले चाहते; म्हणाले, ‘…हे अधुरे बिधुरे नको’
-शहनाझ गिलपेक्षा तिचा ‘मुलगा’च आहे अधिक गोड, क्यूटनेसमध्ये तैमूर-इनायालाही देतोय जोरदार टक्कर
-शहनाझ गिलचा चेहरा पाहून चाहत्यांना जाणवली उदासीनता, व्हिडिओ पाहून करतायत विचारपूस